मुंबई : मराठा आरक्षणाबाबत आज मातोश्रीवर मशाल मार्चचे आयोजन केले आहे. याबाबत पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांच्या घरावर मशाल मार्च काढणारच असा पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक राजन घाग यांनी निर्धार केला आहे.
मराठा क्रांती महामोर्चा तर्फे वांद्रे शासकीय वसाहत ते मातोश्रीपर्यंत मराठा क्रांती मोर्चा मशाल मोर्चाचे आयोजन केले आहे. त्याची तयारी देखील वांद्रे शासकीय वसाहतीच्या जवळील उद्यानात सुरू आहे. मात्र या मोर्चाला पोलिसांची परवानगी नाही. तरी मोर्चा काढणार असल्याचा आयोजकांचा निर्धार आहे.
पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवला असून कायदा आणि सुवव्यवस्था बिघडणार नाही याकड लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान, पोलिसांनी परवानगी दिली नाही, तरीही आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मातोश्रीवर मशाल मोर्चा निघणार म्हणजे निघणारच, अशी माहिती शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा दृष्टकोन उदासीन असून मराठा मोर्चाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचे मेटे यांचे म्हणणे आहे.
आज ‘मातोश्री’वर मशाल मोर्चा
मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय वांद्रे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या ‘मातोश्री’पर्यंत मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चावेळी खऱ्या मशाली आणू नका. या मोर्चासाठी प्रतिकात्मक मशालींचा वापर केला जाईल अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक राजन घाग यांनी दिली आहे.
आज संध्याकाळी 5 वाजता हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या, ज्या मुलांची नोकरीसाठी निवड झाली आहे परंतु आरक्षणाच्या निर्णयामुळे प्रक्रिया रखडली आहे, यांच्याबाबतीत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्या आशा विविध मागण्या असणार आहेत. आज मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुंबई समन्वयक राजन घाग यांनी ही माहिती दिली.
Read Also –
अर्णब गोस्वामीचा कारागृहातील मुक्काम वाढला..जाणून घ्या न्यायालयात काय घडलं
..म्हणून ‘या’ कारणामुळे अर्णब गोस्वामीला पोलिसांनी केली होती दिवाळीआधी अटक
मराठा आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना ‘या’ कारणामुळे पोलिसांकडून नोटीसा
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘या’ नेत्यांना विधानपरिषदेवर संधी
महाविकास आघाडी सरकारने ‘मराठ्यां’च्या पाठीत खंजीर खुपसला: चंद्रकांत पाटील