बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. गेल्या तीन टर्म असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना कडवी टक्कर देण्यासाठी सुनेत्रा पवारांनी चांगलीच कंबर कसली आहे. मागील काही दिवसापासून बारामती मतदारसंघाच्या प्रत्येक ठिकाणी सुनेत्रा पवार गाठीभेटी घेत असल्याचे दिसून येत आहे. सध्या उन्हाचा कडक पारा असतानाही सुनेत्रा पवार मतदारसंघात फिरत असल्याचेही दिसून येत आहेत.
हेही वाचा... “श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये खाल्ले “, मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रावर गंभीर आरोप
बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या रोज गावभेटी देणे, नागरिकामध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचे काम करीत आहेत. अशातच आज त्या धायरी दौऱ्यावर असून धायारीतील नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून पुण्यातील उष्णतेचा पारा ४० अंशापर्यंत पोहोचला आहे.
मात्र रखरखत्या उन्हातही सुनेत्रा पवार यांना पाठींबा देण्यासाठी धायरीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. ढोल-ताशांच्या गजरात सुनेत्रा पवार यांचे धायरीत स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी धायरीतील रहिवासी मोठ्या संख्येने जमले होते.
सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा असल्याचा विश्वास मतदारांनी यावेळी व्यक्त केला. या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा...गावाच्या वेशीवरच लागलेत कोल्हेंच्या विरोधात बॅनर, शिरूर मतदारसंघात नेमकं घडतंय तरी काय ?
हेही वाचा…“इतका सच्चा, तत्वनिष्ठ, सज्जन, साधा, भोळा…” मनसेचं उद्धव ठाकरेंना खोचक पत्र
हेही वाचा…पुण्यात कॉंग्रेसमध्ये भडका, फडणवीसांसोबत चर्चा, आबा बागुल भाजपच्या वाटेवर ?
हेही वाचा…“ही निवडणुक भावकी, गावकीची नाही, “अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…“ही निवडणुक भावकी, गावकीची नाही, “अजित पवार यांचं मोठं वक्तव्य