वसई-विरार महापालिकेच्या वरुण इंडस्ट्रीज येथील कोरोना उपचार केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांना कोणत्याही सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी घेऊन मनसेचे पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आयुक्तांना भेटायला गेले होते. यावेळी आयुक्त गंगाथरण डी यांनी केवळ दोनच जणांना भेटता येईल असे सांगितले. यावरून पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि आयुक्त यांच्यात वाद निर्माण झाला.
या वेळी अविनाश जाधव यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर येत दालनाच्या दरवाज्यावर पालिका केंद्रातील दुरावस्थेचे फोटो लावत आयुक्तांच्या विरोधात नारेबाजी करत प्रतिउत्तर दिलं होतं. पालिका आयुक्त गंगाथरण डी यांना अपशब्द केल्याप्रकरणी मनसेच्या उपजिल्हाध्यक्षाला विरार पोलिसांनी काल अटक केली होती.
आयुक्त शिवसेनेच्या सांगण्यावरून मनसे विरुद्ध भूमिका घेत असल्याचा आरोप मनसेच्या शिष्टमंडळाने केला होता. कारण हेच आयुक्त मोठ्या संख्येने येणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अशा भेटी देत असल्याचे पुरावे देखील समोर आले आहेत. वाद झाल्यानंतर मुख्य मागणी असलेल्या वरुण इंडस्ट्रीज येथील कोरोना उपचार केंद्रात सुविधा सुरळीत करून देण्यासाठी प्रयत्न न करता सर्व प्रशासकीय शक्ती मनसेची स्थानिक शाखा तोडण्यासाठी खर्ची घातल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पालिका आयुक्त गंगाथरण डी हे द्वेषाने काम करत असल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे.
त्यातच आता पालिका आयुक्त गंगाथरण डी यांच्या अडचणी वाढतील अशी आणखी एक बाब समोर आली आहे. वसई विरार महानगर पालिकेमध्ये टंकलेखन काम करणाऱ्या एका महिलेस आयुक्तांनी स्वतःच्या घरात झाडू आणि भांडी घासायच काम दिल होते त्या महिलेने नकार दिला तर तिला कामावरून काढून टाकले. या महिलेचे नाव योगिता जाधव असून त्या पदविधर आहेत. याबातची तक्रारत्यांनी अविनाश जाधव यांच्याकडे केली होती.