नवी दिल्ली : सत्ताधारी भाजप सरकारला फेसबूक सहकार्य करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षानी केला आहे. फेसबूक पक्षपात करीत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. याबाबत वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर फेसबूकने भाजचे नेते आमदार टी राजा सिंह यांचे फेसबूक अंकाउट बंद केले आहे. टी राजा सिंह यांच्या काही वादगस्त पोस्ट फेसबूकने काढून टाकल्या होत्या.
व्देष आणि हिंसात्मक पोस्ट फेसबुकवर शेअर केल्यावरून भाजपचे आमदार टी राजा सिंह यांच्यावर फेसबुकने बंदी घातली आहे. टी राजा सिंह हे तेलंगाना येथील आमदार आहेत. टी राजा सिंह यांनी व्देष आणि हिंसात्मक घटना वाढतील अशा पोस्ट केल्या होत्या. फेसबूकच्या नियमाचे त्यांनी उल्लंघन केल्यामुळे त्यांचे फेसबूक अंकाऊट बंद करण्यात आले असल्याचे फेसबूकच्या प्रवक्यांनी सांगितलं आहे.
संसदेच्या सोशल मीडिया समितील काँग्रेसच्या सदस्यांनी फेसबूक आणि भाजप यांची मिलीभगत असल्याचा आरोप केला. पण फेसबूकने त्यांचे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले.फेसबूकचे भारतातील प्रमुख अजित मोहन यांनी काल संसदीय समितीला ही माहिती दिली. त्यानंतर याबाबत दोन तास चर्चा करण्यात आली.
Read Also
BREAKING NEWS
PM मोदींना देखील ‘हा’ सवाल विचारावा ! संजय राऊत यांचे विरोधकांना आव्हानhttps://t.co/pttqEdc29D@rautsanjay61 @ShivsenaComms— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 3, 2020