मुंबई : महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोकांना त्यांनी बोलवलं होतं. पुर्ण मुंबईत हा मोर्चा होता, आझाद मैदान देखील भरायला हवं होतं. परंतु ते त्यांना काही जमलं नाही. त्यामुळे हा मोर्चा त्यांचा अयशस्वी झाला आहे. असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या टिकेला देखील प्रत्युत्तर देतांना शाब्दिक टोला हाणला आहे. त्यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“राज्यपालांची हकालपट्टी करा नाही तर..;” शरद पवारांचा महामोर्चातून मोठा इशारा, महाराष्ट्र पेटणार..?
महाविकास आघाडी मोर्चा हा नॅनो मोर्चा आहे असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांची बुद्धीच नॅनो झाली आहे. मोच्याचे मोजमाप नीट लक्षात येत नसेल तर आपली, वाचाळ राज्यपाल महोदय, आणि मंत्रिमंडळातील नॅनो बुद्धीच्या सहकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, अशी टिका अंबादास दानवे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुंबई तोडण्याची जी त्यांची स्क्रिप्ट आहे. ती मागील दहा वर्षापासून आम्ही बघत आलो आहे. त्यामुळे त्यांनी आता त्यांचा स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे. तसेच उद्धव ठाकरे यांची कसेट अडकली आहे. ती आता त्यांनी पुढे ढकलावी. कारण मुंबईला कोणीही तोडणार नाही. हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे त्यामुळे त्यांनी आता स्क्रिप्ट रायटर बदलावा अशी टिकाही त्यांनी केली आहे.
“खोके, तोतये, लंफगे, पाठीत वार, महाराष्ट्र द्रोही,,,” मुंबईत उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर एल्गार
दरम्यान, तसेच आजचा मोर्चा हा केवळ राजकीय मोर्चा होता. कारण जे लोकं संतांना शिव्या देतात. देव देवतांना शिव्या देतात. वारकऱ्यांना शिव्या देतात. अशी मंडळी आज कोणत्या तोंडाने आज याठिकाणी मोर्चा काढत आहेत. ? महाराष्ट्रातील कोणत्याही मानकांचा अपमान होऊ नये आणि तो जर कुणी करत असेल तर त्यांच्या मताशी आम्ही सहमत नाही.परंतु तो विषय जाणूनबुजून केला जात आहे. असंही फडणवीस म्हणाले.
#महाविकासआघाडीमोर्चा हा नॅनो मोर्चा आहे असे म्हणणारे @Dev_Fadnavis यांची बुद्धीच नॅनो झाली आहे. मोर्च्याचे मोजमाप नीट लक्षात येत नसेल तर आपली, वाचाळ राज्यपाल महोदय आणि मंत्रिमंडळातील नॅनो बुद्धीच्या सहकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी!
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 17, 2022
Read also
- “चंद्रकांत पाटलांनी घेतला शाई फेक प्रकरणाचा धसका, आता तोंडावर थेट फेसमास्क लावला”
- अन्, स्टेजवरच सुषमा अंधारेंनी शरद पवार अन् उद्धव ठाकरेंचे घेतले आशीर्वाद, भाजपची टिका
- “राज्याच्या मातीला फुटीचा, गद्दारीचे संकट तेव्हा महाराष्ट्र पेटून उठतो” ; अजित पवार
- “देवेंद्रजी…! Cool Down, तुमचा जळफळाट आम्ही समजू शकतो”; राष्ट्रवादीने फडणवीसांना डिवचलं
- “उद्धव ठाकरेंनी आपला स्क्रिप रायटर बदलावा”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं