आळंदीसारख्या भक्तिमय क्षेत्रातून माउलींचा आशीर्वाद घेऊन आलेली कार्तिकी गायकवाड ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरातच नाहीतर सर्वांच्या मनात तिने तिच्या आवाजाने एक वेगळेच स्थान निर्माण केले. अवघ्या वयाच्या ९ व्या वर्षी झी मराठी वरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ 2008 सालच्या पहिल्या शोचं विजेतेपद “कार्तिकी गायकवाड” हिने जिंकलं होतं. या नंतर अमाप प्रसिद्धी मिळवत गायन क्षेत्रातच तिनं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
आता हि आपली लिटिल चॅम्प लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच तिला पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. सोशल मीडियावर साधा तिचा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो जोरदार चर्चेत आहे. कार्तिकी गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार हे निश्चित.
कार्तिकीनं गायन क्षेत्रात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिनं गायलेल्या भक्ती गीतांनाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळतो. भजन कीर्तन अशा विविध कार्यक्रमात सहभाग दर्शवून कार्तिकीनं सुत्रधाराचं कामही चोख बजावलेलं पाहायला मिळतं. पंढरीच्या वारीमध्ये तिनं केलेलं सूत्रसंचालन खरंच पाहण्याजोग होतं लोकांनी तिच्या ह्या कलेलाही भरभरून प्रोत्साहन दिलं.
दरम्यान कार्तिकीच्या होणाऱ्या साथीदाराचे नाव रोनित पिसे असून तो एक मॅकॅनिकल इंजिनियर आहे. त्याचबरोबर त्याचा स्वतःचा व्यवसायही आहे. याच महिन्यात २६ जुलै रोजी कार्तिकी आणि रोनित यांचा साखरपुडा होणार आहे. त्यानंतर लग्नाची तारीखही लवकरच जाहीर केली जाईल.