मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 12 डिसेंबरला वयाची 80 वर्ष पुर्ण केली. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी देखील ट्विटरवर पोस्ट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या अर्धशतकीय राजकीय वाटचालीतील शरद पवार यांनी प्रत्येक पावलावर, प्रत्येक बिंदूवर घेतलेले निर्णय खऱ्या अर्थाने संविधानाच्या सरनाम्याची अंमलबजावणी असून ते खऱ्या अर्थाने त्यांच्या पीढीचे सरताज असल्याचे फौजिया खान म्हटले आहे.
Wishing Hon’ble Shri Sharad Pawar a very happy birthday and a long happy life @NCPspeaks @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @supriya_sule pic.twitter.com/JbtzKCWn6q
— Fauzia Khan (@DrFauziaKhanNCP) December 13, 2020
महिलांच्या सक्षमीकरणातून राष्ट्र विकास हे शरद पवारांचे धोरण असल्याचे देखील फौजिया खान यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, समाज सुधारणेच्या या धावपट्टीवर हे ‘ बॅटन ‘ देशाला पुढे नेण्यासाठी, महीलांना सक्षम करण्यासाठी विविध देशातील महापुरुषांनी एकमेकांच्या सुपूर्द करत धावपटटीवरील ही दौड कायम ठेवली असल्याचे दिसून येते. राजाराम मोहनरॉयपासून ते महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एकमेकांच्या स्वाधीन केलेले हे बॅटन सद्यास्थितीत श्री शरदचंद्रजी पवार यांनी धूरा समजून स्वयंस्फूर्त स्वीकारली आहे.
2002 साली सर्वात प्रथम शरद पवारांना भेटल्याचे देखील त्यांनी सांगितले. खान म्हणाल्या की, . मला अजूनही आठवते, मी त्यांना 21 फेब्रुवारी, 2002 ला त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी पहिल्यांदा भेटले. हा दिवस तोच होता, ज्या दिवशी मला विधान परिदेसाठी नामनिर्देशित करण्यात आले होते. हा तोच दिवस होता, ज्या दिवशी मला त्यांनी दिशा दाखवत दृष्टी दिली. मार्गदर्शक सूचना केल्या.