गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र कोरोनाचे संकट असताना देखील अनेकांनी बाप्पाचे स्वागत केले आणि बाप्पाची स्थापना केली. त्यावेळी अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी थेट संविधान गणेश मूर्ती खाली ठेऊन गणेश स्थापना केली त्यानंतर संविधानाचा अपमान केला म्हणून अनेकांनी तरडेंवर टीकेची झोड देखील उठवली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील गृहमंत्र्यांना याबाबत एक पत्र लिहून तरडेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संविधानाचा अपमान करणाऱ्या प्रवीण तरडे वर कायदेशीर कारवाई करण्याबाबत खदान पोलीस स्टेशन अकोला येथे मिटकरी यांनी निवेदन दिले असुन याबाबत एक पत्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील पाठवले असल्याचे मिटकरी यांनी आपल्या ट्विटरद्वारे म्हंटले आहे.
संविधानाचा अपमान करणाऱ्या प्रवीण तरडे वर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आज खदान पोलीस स्टेशन अकोला येथे निवेदन दिले असुन याबाबत तसे पत्र गृहमंत्री अनिल जी देशमुख साहेबांना मेल केले आहे. @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/cLH7VpCmeo
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 23, 2020
प्रवीण तरडे यांनी हा प्रकार अनवधानाने घडला असून त्याबाबद्दल माफी देखील मागितली आहे. तसेच ही चूक असल्याचे देखील कबुल केले होते मात्र त्यानंतरही अनेक दलित चळवळीतील कार्यकर्त्यानी तरडे यांच्यावर टीकेची झोड उठवल्याचे पहायला मिळाले. तसेच तरडे यांच्यासोबत संभाषणाचे अनेक ऑडिओ देखील व्हायरल होताना सोशल मीडियावर दिसून आले आहेत.