मुंबई: मुंबईत जागतिक जागतिक महामारीचा प्रसार गेले वर्षभर आहे. हा प्रसार रोखण्यासाठी मुंबईत गेले तीन महिने लसीकरण सुरू आहे. पालिका, सरकारी अशी 59 लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात 73 अशी एकूण 132 लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जाते. आतापर्यंत 22 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मुंबईत दिवसाला 30 ते 50 हजार लसीकरण केले जात आहे. त्या प्रमाणात लसीचा साठा कमी मिळत असल्याने लसीचा तुटवडा जाणवत असल्याने अडचणी येत होत्या. लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते. आता मात्र लसींचा नवीन साठा आल्याने पुढील तीन दिवस न थांबता लसीकरण मोहीम चालू राहणार आहे.
आता मात्र मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची माहिती समोर येत आहे. कालच केंद्र सरकारकडून मुंबई महापालिकेला आता तब्ब्ल १ लाख ५८ हजार लसींचा पुरवठा झालेला आहे. या मध्ये १ लाख ५० हजार लस या कोव्हिडशील्ड आहेत तर बाकीच्या ८ हजार लस कोवॅक्सिन आहेत. सदर लसींचा साठा हा महापालिकेच्या कांजूरमार्ग च्या जवळ असलेल्या प्रादेशिक लसीकरण साठवण केंद्रात ठेवलेला आहे. मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी अशा सर्व लसीकरण केंद्रांना कांजूरमार्ग येथूनच, त्यांची सरासरी दैनंदिन आवश्यकता लक्षात घेऊन लस साठा वितरण सुरू करण्यात आले आहे.
आता लसीचा साठा आल्याने उद्या सोमवार पासून बुधवार पर्यंत लसीकरण करता येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मुंबईत जागतिक जागतिक महामारीचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती . 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. आता पर्यंत मोठ्या प्रमाणात लोकांनी लस टोचवून घेतलेली आहे.