संसदेच्या अॅनेक्स इमारतीत आज सकाळी जवळपास 7 वाजता आग लागल्याची घटना घडली. मात्र अग्निशामक दलाने वेळेवर घटनास्थळी पोहत स्थितीवर नियंत्रण मिळवले. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आता आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
#UPDATE Delhi: The fire that broke out on the 6th floor of the Parliament Annexe Building, has been brought under control. 7 fire tenders were engaged in the fire fighting operation. https://t.co/8b0t2sce4M
— ANI (@ANI) August 17, 2020
इलेक्ट्रिक बोर्डजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशामक दलाने त्वरित आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ ठळला.
दिल्ली फायर सर्विसचे अधिकारी या आग प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्याप कोणतीही जीवतहानी यात झालेली नाहीये.