IMPIMP
First of all, Narendra Modi should make peace with the two unsatisfied souls First of all, Narendra Modi should make peace with the two unsatisfied souls

“सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनी “त्या” दोन अतृप्त आत्म्यांची शांती करायला हवी”

मुंबई : केंद्र सरकारमध्ये देखील आता दोन अतृप्त आत्मे आहेत. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोन अतृप्त आत्मे आहेत. आधी त्यांच्या अतृप्त आत्म्याचं समाधान मोदींनी करावं. शरद पवारांनी म्हटलं आहे की भटकती आत्मा कोणाला सोडणार नाही. आता जोपर्यंत नरेंद्र मोदी यांना पदावरून खाली खेचणार नाहीत, तोपर्यंत आमचा आत्मा शांत राहणार नाही. सगळ्यात आधी नरेंद्र मोदी यांना त्या दोन अतृप्त आत्म्यांची शांती करायला हवी. अशी टिका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलीय.

हेही वाचा…“लोकसभेसारखं विधानसभेच्या जागावाटपाचं गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालून नका,” भुजबळांनी आधीच सगळं केलं स्पष्ट 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टिका करत त्यांचा उल्लेख अतृप्त आत्मा असा केला होता. त्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यावर आता हा अतृप्त आत्मा तुम्हाला सत्तेपासून खाली खेचणार नाहीत, तोपर्यंत शांत बसणार नाहीत. असा इशारा दिला होता. त्यानंतर शरद पवारांचे चार खासदारांवरून आठ खासदार महाराष्ट्रात निवडून गेलेत.

हेही वाचा..“धनंजय मुंडे, आता सुट्टी नाही हं..! सर्दी, पडसं झालं असं आम्ही ऐकणार नाय”, तटकरेंनी चांगलंच सुनावलं 

दरम्यान, पुढे बोलतांना संजय राऊत म्हणाले की, ज्या पद्धतीने मंत्रीमंडळाचं वाटप करण्यात आलं. त्यावरून दिसतं आहे की, एनडीतील सर्वांचाच आत्मा अतृप्त आहे. महाराष्ट्रात आमचा सर्वाचं आत्मा अतृप्त आहेच. कारण जोपर्यंत तुम्हाला सत्तेवरून खाली खेचणार नाही. तोपर्यंत आमचा आत्मा भटकत राहणार आहे. विधानसभेची निवडून महाविकास आघाडी एकत्र लढवणार आणि आम्ही जिंकणार. असंही राऊत म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा…कोण होणार लोकसभेचे अध्यक्ष ? आंध्र प्रदेशच्या ‘या’ महिलेची जोरदार चर्चा 

हेही वाचा..राज्यातील ‘सहा’ मंत्र्यांवर सोपविली विविध खात्याची जबाबदारी, वाचा सविस्तर 

हेही वाचा..राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी मोहोळांकडे सहकार खाते, भाजप नेतृत्वाची महाराष्ट्रात मोठी खेळी 

हेही वाचा…“बारामतीचा दादा आता बदलायला हवा, युगेंद्र पवारांना विधानसभेची उमेदवारी द्या,” शरद पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी 

हेही वाचा..पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा..! मंत्रीपदाची शपथ अन् पहिल्याच दिवसापासून कामाला सुरुवात