पुणे: वाहतूक कोंडीची समस्या आणि वेळेची बचत या गोष्टी लक्षात घेऊन लवकरात लवकर चांदणी चौकातील पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही अस वक्तव्य उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे. नाशिक रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नाशिक फाटा ते मोशी रस्ता रुंदीकरण काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा अशी सूचना पवारांनी केली आहे. आयोजित केलेल्या बैठकीत अधिकार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुरू असलेल्या कामांबाबत माहिती दिली आहे.
उड्डाणपूलाचे काम अत्यंत महत्त्वाचे असून लवकरात लवकर महानगरपालिकेने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावीत अशी सूचनाही पवारांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भल्या पहाटे कामांची पाहणी केल्यानंतर अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी या बैठकीत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख विभागीय आयुक्त सौरभ राव पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच वेगवेगळ्या विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुण्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सकाळी धक्कातंत्र वापरत भल्या पहाटे पिंपरी चिंचवडमध्ये येऊन पुणे मेट्रोची पाहणी केली आहे. पालकमंत्री अजित पवार हे दररोज सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करत असतात, त्यासाठी ते प्रसिद्ध आहे. अनेकवेळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा अजित पवार यांच्या या सवयीबद्दल जाहीर कौतुकही केलेलं आहे.
आता पुण्याचा कारभार हाती आल्यानंतर पवार हे सातत्याने पुण्यात लक्ष घालून आहेत. वेळेच्या बाबतीत अत्यंत दक्ष असलेले उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या धक्कातंत्राचा अनुभव पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांना आज आला. अजित पवार हे आज सकाळी सहा वाजताच पुणे मेट्रोच्या कामाच्या पाहणीसाठी पोहोचले. अर्थात, या साऱ्याची कल्पना असल्यानं अधिकारीही सज्ज होते. अजितदादांनी मेट्रो प्रकल्पाची सर्व माहिती घेऊन अधिकाऱ्यांसोबत मेट्रो प्रवासही केला.पुण्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार पुण्यात आहेत.
Read Also :
https://politicalmaharashtra.in/mumbai-rain-mns-on-shivsena-9678/