राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी सन 1900 मध्ये त्यांचा चष्मा लंडनमधील एका कुटुंबास भेट दिला होता. या चष्म्याला सोन्याच्या कडा आहेत. त्यांच्या या लंडनमधील चष्म्याच्या जोडीचा लिलाव करण्यात येत आहे. या चष्म्यांचा लिलाव 10-15 हजार पाऊंड म्हणजे भारतीय मुल्यानुसार 9.77 ते 14.66 लाख रुपयांपर्यंत होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आमच्याकडील डाकपेटीत असलेल्या या चष्म्याचा एवढा सुवर्ण इतिहास असल्याचे समजल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटले. इंग्लंडमधील एका वृद्ध विक्रेत्याकडे गांधींजींचे हे चष्मे होते. या विक्रेत्याच्या काकांना महात्मा गांधींनी स्वत: हे चष्मे भेट दिले होते. ब्रिटीश पेट्रोलियममध्ये काम करत असताना 1910-30 मध्ये गांधीजींनी त्यांना ही भेट दिली होती, असे लिलावकर्त्याने सांगितले. दक्षिण-पश्चिम इंग्लंडच्या उपनगरातील हनहम स्थित ‘ईशान्य ब्रिस्टल ऑक्शन’ कंपनीने रविवारी सांगितले की, त्यांच्या पोस्टमध्ये असलेल्या चष्म्याच्यामागे इतका गौरवशाली इतिहास असू शकतो हे जाणून आम्हाला आश्चार्य वाटले.
ऑनलाईन पद्धतीने हा लिलाव होत असून अनेक ग्राहकांना या चष्म्याने आकर्षित केले आहे.भारतीयांना या चष्म्याच्या खरेदीसाठी विशेष उत्साह असल्याचे दिसून येते. आत्ताच, 6 हजार पाऊंडला या चष्म्याची ऑनलाईन मागणी करण्यात आली आहे.