कोरोना व्हायरसमुळे अद्याप शाळा-महाविद्यालये सुरू झालेली नाही. ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण काहीप्रमाणात सुरू झाले आहे. असे असले तरी अनेक राज्य सरकार टिव्ही चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू केले आहेत. आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील शैक्षणिक वर्गासाठी दूरदर्शन आणि खाजगी चॅनेलच्या सहकाऱ्यांने उपक्रम सुरू करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.
प्रमोद सावद यांनी आमदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, गोवा दूरदशर्नचा शिक्षणासाठी वापर करण्याच्या शक्यतेवर सरकार विचार करीत आहे. त्यासाठी दुरदर्शनसह खाजगी टीव्ही चॅनेलचे सहकार्य घेण्याचाही विचार आहे.
याशिवाय मुले परीक्षा देताना कॉपी करतील, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की,परंतु गोवा विद्यापीठ ही परीक्षा घेत असल्यामुळे विद्यापीठ या विषयी योग्य काळजी घेणार असल्याचे सांगितले.