पणजी: गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तोफा या काहीशा थंड झाल्या. प्रमुख राज्ये उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोवा राज्यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सकाळीच मत मोजणीला सुरुवात झाली आहे. पहिला कल हा नुकताच हाती आला आहे.
गोव्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल असं सर्वच पोलमध्ये दाखवण्यात आलं होतं. आता गोव्याचे निकाल समोर आले आहेत आणि काँग्रेस, भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे निकाल समोर येत आहेत. गोव्यात सर्वात मोठा धक्कादायक निकाल समोर आता आला आहे. स्वर्गीय. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल परिकर यांचा ७१५ मतांनी पराभव झाला आहे.
गोव्यात भारतीय जनता पक्ष २० जागांवर विजयी होण्याच्या दिशेने आहे. तर काँग्रेस पक्षाला १२ जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षाने जे काही उमेदवार उभे केले होते, त्यातील बऱ्याच जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
भाजपनं सातत्याने गोव्यात आक्रमक प्रचार केला होता. भाजपचे विश्व्जीत राणे यांना देखील विजय प्राप्त झाला आहे. डॉ. प्रमोद सावंत आणि प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आक्रमक प्रचारामुळे भाजपची विजयी दिशेने घौडदौड सुरु झाली आहे.