या बैठकीत मुकेश अंबानी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत
जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुगल ची गुंतवणूक
फेसबुक, सिल्वर लेक सारख्या जवळपास 11 कंपन्यांनी जिओमध्ये भागीदारी घेतल्यानंतर आता गुगलही जिओसोबत करार करणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे. गुगल जिओमध्ये 7.7 टक्के 33, 737 कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
5G ची लवकरच चाचणी घेणार – मुकेश अंबानी
मुकेश अंबानी यांनी रिलायन्स एजीएममध्ये बोलताना सांगितले की, अनेक मोठ्या संधी संकटाच्या वेळी येतात. रिलायन्सचे मार्केट कॅप 150 बिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे. याचसोबत मुकेश अंबानी यांनी गूगलसोबत करार करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, गूगल जिओमध्ये 7.7 टक्क्यांची भागीदारी करणार आहे. म्हणजेच 33 हजार 737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
त्याचबरोबर मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओ लवकरच भारतात वर्ल्ड क्लास 5G सेवा सुरु करणार आहे. त्याचबरोबर आम्ही ग्लोबली टेलिकॉम ऑपरेटर्सना 5G सॉल्यूशन देणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी यावेळी दिली.
O-to-C बिझनेस प्लॅन
या बैठकीमध्ये रिलायन्स समुहाच्या रिटेल बिझनेस ग्रोथ संदर्भात सविस्तर चर्चा केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे O-to-C बिझनेस प्लॅनबाबत माहिती देण्यात येईल. जाणकारांच्या मते या बैठकीमध्ये कंपनी Aramco करारासंदर्भात माहिती देऊ शकतात. मॉर्गन स्टेनली यांच्या मते आजच्या एजीएममध्ये O-to-C बिझनेसमधील भागीदारी विक्रीच्या प्रगतीबाबत माहिती देण्यात येईल.
रियान्स जिओ आता रिटेलमध्ये काही नवा उपक्रम सुरू करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे JioMart या नव्या ई कॉमर्स व्यवसायाची मोठी घोषणाही आज होऊ शकते.