मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सुचवलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे स्विकारणारच नाही, असा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा आधार देत त्यांनी म्हटलंय कि, माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं या विषयावर बोलणं झालं असून याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारींशीही चर्चेत झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली आमदारांची यादी राज्यपाल बाजूला काढून ठेवणार आहेत, अशी माहिती मिळाल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर काही महिन्यांतच या नेमणुका होणार होत्या पण राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारशी विनाकारण केलेल्या संघर्षामुळे या नेमणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही तिनही पक्ष प्रत्येकी चार जागा वाटून घेणार आहेत. यामध्ये अनेक लोकांची नावं चर्चेत आहे. पण यामध्ये नेमकं कुणाची नावं आहे आणि कुणाची निवड झाली आहे हे फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच माहिती असल्याचं वक्तव्य काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगांवात केले होते.
Read Also ;
बांगलादेशी घुसखोरांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी MIM आमदारांचे लेटरहेड, ‘या’ देशद्रोह्यांना लवकरात लवकर अटक करा- भाजपhttps://t.co/D7SmW7vpfX @BhatkhalkarA @BJP4Maharashtra @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 2, 2020