राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान पार पडेल. तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. कोरोनाच्या सावटाखाली या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे.
कोरोनाचे सावंत असताना देखील अनेक जण येऊन आपल्या मतदानाचा हक्कबाजावत आहेत. सामान्य लोकांसोबतच राजकारणातील मोठे नेते देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला, पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी केलं मतदान, बारामतीच्या एमईएस हायस्कूलमध्ये बजावला मतदानाचा हक्क.
भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील बजावला मतदानाचा हक्क.
पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरी मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. “ही शाई नाही, भविष्य आहे. पदविधारांनो आपले अमूल्य मत नोंदवा व प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करा”, असा संदेश आमदार महेशदादा लांडगे यांनी सर्वसामान्यांना दिला आहे.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही मतदानाचा हक्क बजावला, बेझनबाग परिसरातील नागसेन विद्यालयात मतदान, नागपूर पदवीधर मतदार संघात आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला, भाजपचं वर्चस्व असलेला मतदार संघ आम्ही नक्कीच जिंकू, आम्हाला यात मोठं यश मिळेल, असंही ते म्हणाले
आमदार राहुल कुल आणि कांचन कुल यांनी बजावला मतदानाचा हक्क, दौंड तालुक्यातील राहू येथील कैलास विद्या मंदिर येथे जाऊन केलं मतदान, पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी राहुल कुल यांचं सपत्निक मतदान
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर पदवीधर निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला,
खा प्रीतम मुंडेंनी बजावला मतदानाचा अधिकार, पिंपळगाव येथे केलं मतदान, प्रकृती खराब झाल्याने पंकजा मुंडे गैरहजर, कोणीही याचा वेगळा अर्थ काढू नये, मतदारांचा प्रतिसाद पाहता कौल आमच्याच बाजूने, विजय आमचाच होईल, खा. प्रितम मुंडेंना विश्वास
राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूर शहरातील ज्युबिली शाळेच्या मतदान केंद्रावर जात त्यांनी हा हक्क बजावत विद्यमान महाराष्ट्र सरकारच्या विरोधात पदवीधर मतदार आपला रोष व्यक्त करतील, अशी भावना व्यक्त केली. गेले चाळीस वर्ष नागपूर विभागातील पदवीधर मतदार भाजपला संधी देत असून, या भागातील पदवीधरांच्या समस्या सोडवणुकीसाठी विजयाची ही परंपरा कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकार विरोधातील असंतोष प्रकट करण्याची संधी मतदारांना मिळाल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील आज मतदानाचा हक्क बजावला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार
महाविकास आघाडीकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर शिवसेनेचा एक उमेदवार रिंगणात आहेत.
अमरावती शिक्षक मतदारसंघ – श्रीकांड देशपांडे, शिवसेना
पुणे पदवीधर मतदारसंघ – अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस
पुणे शिक्षक मतदारसंघ – प्रा. जयंत आसगांवकर, काँग्रेस
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ – सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस
नागपूर पदवीधर मतदारसंघ – अभिजीत वंजारी, काँग्रेस
भाजपचे उमेदवार
तर भाजपनेही महाविकास आघाडीविरोधात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात उमेदवारी न दिल्याने रमेश पोकळे यांनी बंडखोरी केली आहे. या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार कोण हे जाणून घेऊया
अमरावती शिक्षक मतदारसंघ – डॉ. नितीन धांडे
पुणे पदवीधर मतदारसंघ – संग्राम देशमुख
पुणे शिक्षक मतदारसंघ – जितेंद्र पवार (भाजप पुरस्कृत अपक्ष)
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ – शिरीष बोरनाळकर
नागपूर पदवीधर मतदारसंघ – संदीप जोशी