IMPIMP
Manoharlal Khattar Manoharlal Khattar

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर रुग्णालयात

हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असताना हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही चाचण्या केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मुख्यमंत्री खट्टर यांना शुक्रवारी रात्रीपासूनच प्रकृती बरी नसल्याचे जाणवत होते.
त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांचा एक्स-रे, 2डी इको आदी चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर दोन तासांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे प्राचार्य रजनीश पठानिया यांनी दिली. त्यांच्या चाचणी अहवालात कोविडसंदर्भात काहीच दिसून आले नसल्याचे त्यांनी सांगितले.