मुंबई – मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी हेमंत नगराळेयांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात मोठी घडमोड घडली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सध्याचे राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. त्यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाचं जबाबदारी देण्यात आली आहे.
“हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त,रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार,संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी,परमवीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जवाबदारी” असे ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे
सरकारचा मोठा निर्णय
श्री हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
श्री रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी
श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 17, 2021