देशातील प्रामाणिक करदात्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवीन प्लॅटफॉर्म लाँच करणार आहेत. नियमित कर भरणाऱ्यांना या प्लॅटफॉर्मद्वारे काही सवलती देखील मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकार टॅक्सपेअर चार्टरची घोषणा करू शकते. स्वातंत्र्य दिनाच्या आधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा ‘ट्रान्सपरंट टॅक्सेशन- ऑनिरिंग द हॉनेस्ट’ नावाची योजना लाँच करणार आहेत.
Prime Minister Narendra Modi to launch the platform for “Transparent Taxation – Honoring the Honest” via video-conferencing tomorrow. (file pic) pic.twitter.com/QvLEq0kWWi
— ANI (@ANI) August 12, 2020
केंद्र सरकारने याआधी बजेटमध्ये टॅक्सपेअर चार्टरजी घोषणा केली होती. यानंतर काही दिवसांपुर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देखील याबाबत माहिती दिली होती. टॅक्सपेअर चार्टर लागू केल्याने रदाते तसेच प्राप्तिकर विभाग यांच्यात विश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे. यात करदात्यांच्या अडचणी कमी करून अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होईल. अशी प्रणाली याआधी अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये लागू आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याआधीही करदाते देशाचे निर्माते आहेत. सरकार त्यांच्यासाठी अधिकारांची भेट बहाल करणार आहे, असे म्हटले होते.