IMPIMP
I didn't want to leave Sharad Pawar someone regretted I didn't want to leave Sharad Pawar someone regretted

“शरद पवारांना मी सोडायला नव्हतं पाहिजे होतं”, कुणी केली खंत व्यक्त

मुंबई : मागच्या वर्षी शिवसेनेसह राष्ट्रवादीत देखील मोठी फुट पडली. त्यानंतर अजित पवार हे शरद पवारांची साथ सोडून महायुतीत सामील झालेत. त्यानंतर शरद पवारांच्याकडे कुणीच उरले नाही. ते फक्त एकटेच पडलेत. अशी टिका त्यांच्यावर होऊ लागली. तरीही शरद पवारांनी नव्या सहकाऱ्यांसह पुन्हा पक्ष बांधण्यास सुरूवात केली आणि लोकसभा निवडणुकीत चमत्कार करून दाखवला. यातच आता शरद पवारांबाबत चांगल्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी शरद पवारांबाबत मोठं भाष्य केलंय.

हेही वाचा..अजित पवार गटाकडून ‘हा’ नेता घेणार कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ, दिल्लीत झालेल्या बैठकीत झाला शिक्कामोर्तब

सुर्यकांता पाटील म्हणाल्या की, शरद पवार साहेबांच्या बाबतीत माझ्या मनात खुप राग होता. तो मी अनेकदा वेगवेगळ्या कारणांतून व्यक्त केलाय. शरद पवारांना सोडण्याची खंत माझ्या मनात जरूर आहे. रागात असताना मी विचार करायला पाहिजे होतं. पण तेव्हा मला माझ्यावर झालेला अन्याय मोठा वाटला. कदाचित माझी बुद्धी कमी असेल किंवा अनुभव कमी पडला असेल. मी शरद पवारांना सोडायला नव्हतं पाहिजे. असं माझं स्पष्ट मत आहे.

हेही वाचा…फोडाफोडीच्या राजकारणाचा महायुतीला फटका, बच्चू कडूंचा महायुतीला घरचा आहेर 

महाराष्ट्रात शरद पवारांची किमया पाहायला मिळते आहे. पवार साहेबांनी मला खुप मानसन्मान दिला आहे. शरद पवारांची काय ताकद आहे. आम्हाला माहिती आहे. जेव्हा अजितच्या युद्धाला तोंड द्यायचे ठरवलं. त्या दिवशीच वाटलं की महाराष्ट्रातील सगळ्या पक्षाचं वजन आता कमी होईल. परंतु शरद पवार म्हातारा झाल्यामुळे ज्या लोकांनी कमी लेखलं. त्यांचं आकलन चुकीचं होतं. शरद पवार हे लहान आणि मोठा कधीच नसतात. शरद पवार हे शरद पवार आहेत. असेही त्या म्हणाल्या.

READ ALSO :

हेही वाचा..ठरलं तर मग..! येत्या एक दोन आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ? 

हेही वाचा..महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या अन् भाजपच्या बिल्डर-कंत्राटदार मित्रांना सोपवायचा मनसुबा

हेही वाचा…“बारामतीत कुणी धमक्या देत असेल तर त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार”, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा

हेही वाचा..“ही प्रभू श्रीरामांचीच लीला..!”, प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे भाजपचा पराभव

हेही वाचा..“मी आता थांबणार नाही, शांत बसणार नाही”, लोकसभेचा निकाल फडणवीसांच्या जिव्हारी, केली मोठी घोषणा