सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेत बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत चर्चा केली. सुळे यांच्या मतदारसंघातील मोठा भाग पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. त्या अनुषंगाने ही भेट झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुळे यांनी सुशांतसिंह प्रकरणावर बोलणे टाळले.
सुळे यांचे भाचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंह प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी, अशी भूमिका घेतल्यामुळे पवार कुटुंबात त्याचे जोरदार पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी सुशांत सिंह प्रकरणाचा आपला अभ्यास नसल्याचे सांगत या प्रकरणी बोलणे टाळले.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत माझा अभ्यास नाही’, असा दावा करत खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी आज या विषयी बोलणे टाळले.
Read This Also
ही केंद्राची जबाबदारी आहे . . जीएसटी परिषद बैठकीत अजित पवार कडाडलेhttps://t.co/gczKHIWy1V@AjitPawarSpeaks @NCPspeaks @AjitPawar4Mah
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 27, 2020