नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते एकनाथ खडसे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश महाजन यांच्या वादात ठिणगी पाडणारी एक ऑडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासंदर्भातील क्लिप ही जळगाव लाईव्हने सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये जामनेर तालुक्यातील वडगाव बुद्रुकचा एक तरुण पाणी नसल्याने एकनाथ खडसे यांना फोन करून तक्रार करत असतो. त्यावर एकनाथ खडसे उत्तर देतात की, जामनेरचा आमदार कुठे मेला? ‘वडगाव बुद्रुकच्या त्या तरुणाच्या अडचणीला उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांबद्दल बोलताना म्हटलं आहे की, जामनेरचा आमदार गिरीश काय करतोय तिकडे बायका मागे फिरतोय का नुसता ! त्यावर आमदार साहेब फोन उचलत नसल्याचं तो मुलगा सांगतो.
आता आमदार गिरीश महाजन या क्लिप वरून संतापलेले दिसत आहेत. यामागे कोणाचा हात आहे , हे मला माहिती आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा इलाज मलाच करावा लागेल, असा सज्जड दमच त्यांनी देऊन टाकला. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन हे काल नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी राज्य सरकार कोरोना हाताळम्यात अपयशी ठरले असा आरोप केला. यावेळी पत्रकारांनी त्यांना जळगाव येथील व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लीपविषयी विचारणा केली होती.
मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे एकनाथ खडसे हे अश्या प्रकारे एका शाळकरी मुलासोबत बोलतात हे आश्चर्यकारक आहे. एका लहान मुला सोबत काय बोलावं हे देखील त्यांना कळत नाहीये. त्यांनी असले वक्तव्य करण्याआधी थोडासा विचार करायला हवा होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पदाच्या लालसेपोटी गेलेले खडसे काहीच न मिळाल्यामुळे किती वैफल्यग्रस्त आहेत हे दिसून येत आहे. मला आता खडसेंच्या बाबतीत वयक्तिक लक्ष घालावे लागणार आहेत. त्यांच्या बेलगाम झालेल्या प्रत्येक गोष्टीचा इलाज आता मला माझ्या पद्धतीने करावा लागणार आहे असे देखील महाजन यावेळी म्हटले आहेत. I have to treat Khadse now; Girish Mahajan angry over viral clip