मुंबई : भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) हे सोमवारी अर्णव गोस्वामी यांना भेटण्यासाठी नवी मुंबईच्या तळोजा येथील कारागृहात जाणार आहेत. त्यावेळी ‘हिंमत असेल तर मला अडवूनच दाखवा’, असे जाहीर आव्हान राम कदम यांनी मुंबई पोलीस आणि राज्य सरकारला दिले आहे.
मैं कल तलोज़ा जेल सुबह 11 am #ArnabGoswamy जी को मिलने जाऊँगा . किसकी हिम्मत है तो रोक कर दिखाए . मैं 130 करोड़ देशवासीयों का नुमाइंदा के रुप में वहाँ जाऊँगा . @AnilDeshmukhNCP @OfficeofUT ——#EmergencyInMaharashtra
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) November 8, 2020
कालच राम कदम हे अर्णव गोस्वामी यांच्या सुटकेसाठी घाटकोपर ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत पायी चालत गेले होते. अर्णव यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचे कदम यांनी म्हटले होते. तत्पूर्वी राम कदम यांनी अर्णव गोस्वामी यांच्या सुटकेसाठी मंत्रालयाबाहेर उपोषण केले होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर राम कदम यांना हे आंदोलन मागे घ्यावे लागले होते.