मुंबई : भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला. त्यानुसार, आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले. मलिक यांच्या आरोपाला फडणवीस यांनी ट्विट करुन एका वाक्यात उत्तर दिलं. मात्र, पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न विचारल्यावरही थोडकीच प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
डुकराशी कुस्ती करू नका, तुमचेचं आंग घाण होईल; देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांवर पलटवार
किरीट सोमय्यांमुळे अनिल परब पळून जायला नकोत. परब पळून गेले तर आम्हाला न्याय कोण देणार? असा खोचक सवाल करत दरेकर यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केलीय. सर्व एसटी कर्मचारी संघटनांना आवाहन आहे, तुमच्याकडे मोर्चा वळवायला लावू नका. कर्मचाऱ्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झाले आहात. आता कर्मचाऱ्यांचा विचार करा. तुम्ही एसीत बसा पण आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना बसायला तरी व्यवस्थित जागा द्या, अशी खोचक टीकाही दरेकर यांनी केलीय. त्याचबरोबर मंत्रालयात बसलेल्यांना अजूनही जाग येत नाही. एसटी कर्मचाऱ्यांसाठी 100 वेळा उंबरठे झिजवायला तयार आहे. न्याय मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला आहे.
रियाज भाटी हा तर राष्ट्रवादीचा पदाधिकारी; भाजपचा धक्कादायक खुलासा
संकटाच्या काळात एसटी कर्मचारी तुम्हाला चालतो. पण विलिनीकरणाचा मुद्दा आला तेव्हा अवमान याचिका दाखल करता. कर्मचारी संकटात असताना तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. मी इथे विरोधी पक्षनेता म्हणून आलेलो नाही. एसा एसटी कर्मचाऱ्यांचा मुलगा म्हणून तुमच्यासमोर आलोय. मला तुमचं दु:ख माहिती आहे, अशी खंत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलीय. त्यावेळी दरेकर भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. इतकंच नाही तर विलिनीकरणाचा निर्णय घ्या आणि मगच चर्चेला या, असं आवाहन दरेकर यांनी यावेळी राज्य सरकारला केलंय.
Read Also :
- सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई आपण सोडणार नाही; भाजप नेते गोपीचंद पडळकरांचा निर्धार
- आम्हाला गोळ्या घाला, फाशी द्या पण आम्ही आंदोलनावर ठाम; निलंबित एसटी कामगारांचा सरकारला इशारा
- एसटी आंदोलन चिघळले: गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्यांना अटक, मंत्रालयाजवळ पोलिसांचा फौजफाटा
- एसटी कर्मचाऱ्यांनो प्रवाशांना वेठीस धरू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कळकळीचे आवाहन
- हायड्रोजन सोडा, नवाब मलिकांना आता ऑक्सिजनची गरज पडेल – आशिष शेलार