मुंबई : हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे सकाळी लवंगीसुद्धा लावू शकले नाहीत. त्यांनी लवंगी लावण्याचा प्रयत्न केला त्यातही हात पोळले. नवाब मलिक यांची हतबलता आणि घालमेल इतकी होती की हायड्रोजन सोडा त्यांना ऑक्सिजनची गरज लागेल की काय अशी अवस्था झाली आहे, अशा शब्दात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर टीका केली.
आमदार प्रशांत परिचारक यांच्या गाडीवर फेकले ऑईल; सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य भोवलं
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन रियाझ भाटीबाबतचे नवे खुलासे केले. पंतप्रधान कार्यालय किंवा पंतप्रधानांच्या कार्यक्रमाशी रियाझ भाटीचा काहीही संबंध नाही. फोटोवरूनच संबंध प्रस्थापित करायचे असतील तर त्याच्यासोबत अनेकांचे फोटो आहेत, असं शेलार म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबतचे फोटो दाखवून खळबळ उडवून दिली. फोटो दाखवून कुणालाही बदनाम करण्याचा धंदा करू नका. तुम्ही एक बोट दाखवाल तर तुमच्याकडे चार बोटं येतील, असा इशाराच त्यांनी दिला.
महाविकास आघाडीतील नेते घरात घेण्याच्या लायकीचे नाहीत, त्यांनी बिग बॉसमध्ये जावं – राणे
रियाझ भाटी गायब असल्याचं सांगितलं जातं. तो गायब आहे की त्याला पळवलं गेलं. रियाझ भाटीला पळवून नेण्याचं काम तर राष्ट्रवादीने केलं नाही ना हा आमचा आरोप आहे. वाझेच्या वसुली गँगमध्ये जी नावे समोर आली. त्यात रियाझचं नावही आलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. रियाझ कोठडीत आला तर सत्यबाहेर येईल. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना पळवून लावले नाही ना अशी शंका येत आहे, असा गंभीर आरोप शेलार यांनी केला.
एसटी कर्मचाऱ्यांना दणका: महामंडळाकडून कारवाईला सुरूवात, 376 कर्मचाऱ्यांचं निलंबन
नवाब मलिक यांची आम्हाला चिंता वाटत आहे. दिवसागणिक त्यांचं मानसिक संतुलन बिघडतंय की काय ही आशंका आमच्या मनात आहे. कदाचित हर्बल तंबाखूचा सप्लाय बंद पडला असेल. मलिकजी स्वत:ला शांत करा. राजकारण आपल्या जागी आहे. जावयाच्या प्रेमापोटी आणि स्वत:चं म्हणणं खरं करण्यासाठी राजकारणाच्या नीच पातळीवर जाऊ नका. राजकारणाच्या नीच पातळीचं वर्णन करायचं झालं तर त्याला नवाबी पातळी म्हणता येईल. या नवाबी पातळीपर्यंत आपण जाऊ नये ही आमची इच्छा आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
Read Also :
- रियाज भाटी हा तर राष्ट्रवादीचा पदाधिकारी; भाजपचा धक्कादायक खुलासा
- डुकराशी कुस्ती करू नका, तुमचेचं आंग घाण होईल; देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांवर पलटवार
- नोटाबंदीनंतर फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट चालवले जायचे – मलिकांचा बाँम्ब
- दाऊदशी संबंध असलेला रियाझ भाटी फडणवीसांसोबत जेवण कसा घ्यायचा? – नवाब मलिक
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानेचा आणि मणक्याचा त्रास; लवकरच शस्त्रक्रियेची शक्यता