मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर येत्या दोन तीन दिवसांत शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांना पाठ आणि मानेच्या स्नायूवेदनांचा त्रास होत आहे. त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून ही शस्त्रक्रिया लवकरच केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दिवाळीच्या अगोदर काही दिवस उद्धव ठाकरे यांना स्नायूवेदनेचा त्रास होत होता. यामुळे त्यांचे काही नियोजित कार्यक्रमसुद्धा रद्द करण्याची वेळ आली होती. अखेर वेदना असह्य झाल्यानंतर रुग्णालयात तपासणी करण्यात आली.
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन बेकायदेशीर, कर्मचाऱ्यांनी आर-पार’ची लढाई करू नये – अनिल परब
उद्धव ठाकरे यांची रिलायन्स फाउंडेशनच्या गिरगाव येथील रुग्णालयात तपासणी केली गेली. काही दिवसांपूर्वी ही तपासणी झाली असून त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अद्याप याबाबत मुख्यमंत्र्यांकडून किंवा कुटुंबियांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी संबंध; उद्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडणार – नवाब मलिक
मागील अनेक दिवसांपासून हा त्रास जाणवत असल्यामुळे ठाकरे यांनी भेटीगाठी टाळल्या आहेत. त्यांनी दिवाळीनिमित्त वर्षाबंगल्यावर पाहुण्यांकडून शुभेच्छा घेणेदेखील टाळले होते. सध्या ठाकरे यांचा हा त्रास कमी होत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता आहे.
Read Also :
- एसटी कर्मचाऱ्यांना दणका: महामंडळाकडून कारवाईला सुरूवात, 376 कर्मचाऱ्यांचं निलंबन
- महाविकास आघाडीतील नेते घरात घेण्याच्या लायकीचे नाहीत, त्यांनी बिग बॉसमध्ये जावं – राणे
- आमदार प्रशांत परिचारक यांच्या गाडीवर फेकले ऑईल; सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य भोवलं
- अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय; प्रकाश आंबेडकरांचा रोख नेमका कुणाकडे?
- विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर; 10 डिसेंबरला मतदान होणार