मुंबई : सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अनेक राजकीय फटाक्यांची आतिषबाजी सुरु आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजप नेत्यांवर सोशलवर शेरोशायरीच्या अंदाजात टीका केली जात आहे. अशातच भाजपचे नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाविकास आघाडी चे जवळपास सगळेच नेते काही काम नसल्या सारखे शायरी टाकून देतात, टपोरी मंत्री कव्वाली गातो, गुहागरचा वाळू चोर मिमिक्री करतो, कोण डान्सर नाचवतो, टाईम पास होत नसेल तर MVA च्या नेत्यांनी बिग बॉस मध्ये जावं, जर घेतलं तिथे तर कारण हे सगळे घरात घ्यायच्या पण लायकीचे नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 9, 2021
त्यांनी ट्विट केले आहे की,’महाविकास आघाडी चे जवळपास सगळेच नेते काही काम नसल्या सारखे शायरी टाकून देतात, टपोरी मंत्री कव्वाली गातो, गुहागरचा वाळू चोर मिमिक्री करतो, कोण डान्सर नाचवतो, टाईम पास होत नसेल तर MVA च्या नेत्यांनी बिग बॉस मध्ये जावं, जर घेतलं तिथे तर कारण हे सगळे घरात घ्यायच्या पण लायकीचे नाही.’ असं म्हणत राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
Read Also :
- आमदार प्रशांत परिचारक यांच्या गाडीवर फेकले ऑईल; सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य भोवलं
- अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय; प्रकाश आंबेडकरांचा रोख नेमका कुणाकडे?
- विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर; 10 डिसेंबरला मतदान होणार
- देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी संबंध; उद्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडणार – नवाब मलिक
- एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन बेकायदेशीर, कर्मचाऱ्यांनी आर-पार’ची लढाई करू नये – अनिल परब