पंढरपूर : देशाच्या संरक्षणार्थ सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ कुर्डुवाडी – बार्शी रोडवर रिधोरे (ता.माढा) येथे एका माजी सैनिकाने आमदार प्रशांत परिचारकांची गाडी अडवून गाडीवर ऑइल फेकून भारत की जय, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या. बापू गायकवाड असे माजी सैनिकाचे नाव असल्याचे समजते. ही घटना मंगळवार ९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळच्या सुमारास घडली.
मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का? आर. आर. पाटील यांच्या लेकीची भावूक पोस्ट व्हायरल
मागील काही वर्षापूर्वी पंढरपुर तालुक्यातील जाहीर सभेत आमदार प्रशांत परिचारक यांनी देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिक व त्यांच्या कुटुंबाच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचा निषेध म्हणून भाजपाचे आ. प्रशांत परिचारिका हे कुर्डुवाडी – बार्शी रस्त्यावरून बार्शीकडे जात असताना रिधोरे ता.माढा येथे स्वाभिमानीचा कार्यकर्ता व माजी सैनिक बापू भीमराव गायकवाड याने रस्त्यात सायकल आडवी टाकून आ.परिचारक यांचा मार्ग अडवला व बाटलीतील काळे ऑईल गाडीच्या काचेवर फेकले. याबाबत अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. पण कुर्डूवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून नवाब मलिकांनी जमीन घेतली; देवेंद्र फडणवीसांनी बाँम्ब फोडला
‘पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला, त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना टीकेला समोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांना विधान परिषदेतून दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.
Read Also :
- अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय; प्रकाश आंबेडकरांचा रोख नेमका कुणाकडे?
- विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर; 10 डिसेंबरला मतदान होणार
- देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी संबंध; उद्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडणार – नवाब मलिक
- एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन बेकायदेशीर, कर्मचाऱ्यांनी आर-पार’ची लढाई करू नये – अनिल परब
- उदय शेट्टी आणि मजनू मध्ये संजय राऊतांचा घुंगरू सेठ झालाय – चित्रा वाघ