मुंबई : मागच्या आठवड्यात अहमदनगर येथील रुग्णालयात आयसीयू कक्षाला आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेवरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. संजय राऊत यांनी या आगीवरुन केंद्राला लक्ष्य केल्यानंतर आता महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.
वानखेडेंच्या मेव्हणी देखील ड्रग्झचा व्यवसाय करतात का? नवाब मालिकांचे खळबळजनक ट्विट
“सर्वज्ञानी संजय राऊत नगरच्या आगीच खाप केंद्रावर फोडत आहे. पण व्हेंटिलेटर नव्हे संजय राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनलीय” अशी जळजळीत टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. “डॉक्टर, नर्स यांना बडतर्फ करण्यात सरकार कोणता पुरुषार्थ दाखवतेय. नगर दुर्घटना ही दुर्देवी घटना आहे. हे सरकारी अनास्थेचे बळी आहेत. डॉक्टर आणि काही नर्सला बडतर्फ केले. त्यांचे हे कामच नाही. कारवाई करायची असले, तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आग नियंत्रणाचा समावेश करा” असे चित्रा वाघ म्हणाल्या.
सर्वज्ञानी..नगरच्या आगीचं खापर पण केंद्रावर फोडताहेत..वेंटीलिटर नव्हे तर राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनत चाललीय…
आगीत होरपळलेल्यांची चिंता संजय राऊतांना नाहीये उलट राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांची मर्जी सांभाळावी लागतेय…उदय शेट्टी आणि मजनू मध्ये त्यांचा #घुंगरू_सेठ झालाय
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 9, 2021
“PWD वर प्रश्नचिन्ह का नाही. डॉक्टर बडतर्फ होत असेल, तर मंत्री का नाही? या प्रश्नी श्वेतपत्रिका काढा. भंडाऱ्याच्या घटनेनंतर सरकारी रुग्णालयाचे ऑडिट करू असे आश्वासन दिले होते. पण केले नाही. सरकार फक्त खंडणी गोळा करतेय” अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. “अकरा लोकांचे बळी घेऊनही सरकारची भूक शमलेली नाही. एक वर्ष जुनी इमारत असूनही आग कशी लागते” असा सवाल त्यांनी केला.
Read Also :
- 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून नवाब मलिकांनी जमीन घेतली; देवेंद्र फडणवीसांनी बाँम्ब फोडला
- मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का? आर. आर. पाटील यांच्या लेकीची भावूक पोस्ट व्हायरल
- माझ्या एका खिशात ब्राह्मण अन् दुसऱ्या खिशात वाणी; भाजप नेत्याच वादग्रस्त वक्तव्य
- संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर; भेटीच नेमकं कारण काय?
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल