मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. सकाळी 9 च्या दरम्यान संजय राऊत सपत्नीक पवारांच्या सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. या भेटीचे नेमके कारण काय? यावर चर्चा सुरू आहे.
हिरेंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष नाशिकमध्ये जोमाने लढणार- गिरीश महाजन
दिवाळीच्या काळात शरद पवार आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय बारामतीला होते. त्यामुळे या काळात राऊतांना प्रत्यक्ष भेटता आले नाही. पवार आता मुंबईत आलेले आहेत. आज अगदी सकाळी 9 च्या आसपास संजय राऊत सिल्वर ओकवर दाखल झाले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेआधी संजय राऊत – शरद पवार यांच्यामध्ये बैठक एक चर्चेचा विषय समजला जात आहे. या भेटीचे कारण शरद पवार आणि कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून राऊत दीपावलीच्या शुभेच्छा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या मुलीचं लग्न येत्या काही दिवसात आहे. त्याचे आमंत्रण द्यायला संजय राऊत सपत्नीक गेले असल्याचे समजते. तसेच राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ED, IT भाजपच्या खिशात असेल, पण लोकशाही नाही हे सिद्ध झालं – रोहित पवार
कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु असतानाच आता संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटवरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे. उस जगह हमेशा, खामोश रहा करो जहाँ, दो कौडी के लोग, अपना गुण गाते होते हो, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी ‘दो कौडी के लोग’, असा टोला नेमका कोणाला हाणला आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Read Also :
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
- वानखेडेंच्या मेव्हणी देखील ड्रग्झचा व्यवसाय करतात का? नवाब मालिकांचे खळबळजनक ट्विट
- २५ वर्ष स्वर्गीय बाळासाहेबांनी सेना-भाजपा युती जपली, उद्धव ठाकरेंनी नाही – निलेश राणे
- 30 नोव्हेंबरपर्यंत राज्याचे 100 टक्के लसीकरण पुर्ण करा; उद्धव ठाकरेंचे आदेश
- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ४ जागांवर अडून; वरिष्ठांच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय होणार