मुंबई : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे वाहन चालक गणेश भुते यांच्यावर सांगलीतील आटपाडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर आणि ड्रायव्हर भुते यांनी गाडी अंगावर घालून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजू जानकर याने दिली आहे. त्यांच्या याच फिर्यादीवरून कलम 423 अंतर्गत पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगदीश मुळीक विरुद्ध आमदार सुनील टिंगरे संघर्ष यंदा महापालिकेच्या राजकारणाचा कल ठरवणार
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर पुन्हा एकदा तुफान दगडफेक झाली. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रविववारी सांयकाळी जोरदार राडा झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजू जानकर हे जखमी झाले आहेत. पडळकर यांनी आपल्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप राजू जानकर यांनी केला आहे. मुंबई तकच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, आटपाडीमधील साठे चौकात ही घटना घडली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमुळे सांगलीमधील राजकारण हे चांगलंच तापलं आहे. निवडणूक प्रचार देखील जोरात सुरु आहे.
हिरेंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष नाशिकमध्ये जोमाने लढणार- गिरीश महाजन
अशातच गोपीचंद पडळकर आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे वातावरण आणखी चिघळलं आणि थेट दगडफेकीला सुरुवात झाली. यावेळी उमेदवार, मतदार पळवापळवीवरुनच वाद झाला असल्याचं समोर आलं आहे. सोसायटी गटातील मतदार मेटकरी हे जानकर यांचे नातेवाईक आहेत. त्यावरुनच दोन गटात वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. पडळकर यांनी आपल्या अंगावर गाडी घातल्यामुळेच आपण जखमी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजू जानकर यांनी केला आहे.
Read Also :
- वानखेडेंच्या मेव्हणी देखील ड्रग्झचा व्यवसाय करतात का? नवाब मालिकांचे खळबळजनक ट्विट
- २५ वर्ष स्वर्गीय बाळासाहेबांनी सेना-भाजपा युती जपली, उद्धव ठाकरेंनी नाही – निलेश राणे
- 30 नोव्हेंबरपर्यंत राज्याचे 100 टक्के लसीकरण पुर्ण करा; उद्धव ठाकरेंचे आदेश
- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ४ जागांवर अडून; वरिष्ठांच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय होणार
- ED, IT भाजपच्या खिशात असेल, पण लोकशाही नाही हे सिद्ध झालं – रोहित पवार