मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे, असे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज होणाऱ्या कोविड लसीकरण आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली.
सरकार अस्थिर करण्यासाठीच चौकशा लावल्या जाताय आहेत – धनंजय मुंडे
पंतप्रधान मोदीं आज 50 टक्क्यांपेक्षा कमी कव्हरेज असलेले आणि लसीच्या दुसऱ्या डोसचे कमी कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांसाठी बैठक घेणार आहेत, यात महाराष्ट्राचा जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. भारताने नुक्ताच कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार कोला. मात्र सगळ्याच राज्य त्यांचा लसीकरणाचा अपेक्षीत टप्पा गाठण्यात यश आले नाही. याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांशी आढावा बैठक घेणार आहेत.
100 कोटी वसुली गुन्ह्यातील कमाईचे मुख्य लाभार्थी अनिल देशमुखचं; ईडीचा कोर्टात दावा
या बौठकीत एकूण 40 हून अधिक जिल्हाअधिकारी उपस्थित असतील. हे जिल्हे ज्या राज्यांमध्ये आहेत, त्या राज्यांचे मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. ज्या राज्यांमध्ये लसीकरण कमी आहे त्यात महाराष्ट्र, मेघालय, झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, आणि इतर राज्यांचा समावेश आहे. या बौठकीत महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असतील.
Read Also :
- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ४ जागांवर अडून; वरिष्ठांच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय होणार
- ED, IT भाजपच्या खिशात असेल, पण लोकशाही नाही हे सिद्ध झालं – रोहित पवार
- सोमय्यांनी खोटे आरोप करणे बंद करावे, माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा ठोकणार – काँग्रेस
- प्रतिक काळेच्या आत्महत्येला मंत्री गडाख जबाबदार, पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न – केशव उपाध्येय
- हॉटेल ‘The Lalit’ मध्ये काय गुपित दडलंय? नवाब मलिक रविवारी करणार मोठा गोप्यस्फोट