मुंबई : शिवसेना नेते आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या अहमदनगरच्या दंत महाविद्यालयातील कर्मचारी प्रतीक काळे याने चार दिवसांपुर्वी आत्महत्या केली आहे. या प्रकरणी संस्थेतील ७ जणांविरोधात अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रतीक काळे याने काही वर्ष प्रशांत गडाख यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम पाहिले होते. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत.
आमदार महेशदादा लांडगेचं फेसबुक प्रोफाइल आता झालं अधिकृत, ब्लू-टिक असलेले शहरातील प्रथम आमदार
उपाध्येय म्हणाले, या कामगाराच्या हत्येला गडाख जबाबदार आहेत. गडाख यांच्या संस्थेतील कामगाराने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने बनवलेल्या व्हिडीओत स्पष्ट आरोप असतील तरीही गडाख यांची चौकशी होत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. प्रतिक काळेला न्याय द्यायचा असेल तर गडाख यांनी राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाजुला करावे, अशी मागणीही उपाध्ये यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही
अहमदनगर मधील प्रशांत गडाख यांच्या दंत महाविद्यालयात काम करणाऱ्या प्रतीक काळे याने तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद रोडवर आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओ व्हायरल झाला असून आता संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रतीक काळे या २७ वर्षीय तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी आरोपींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. त्यामुळे सत्तारुढ पक्षाचे लोक दबाव आणत असल्याने प्रतीक बाळासाहेब पाटील यांना न्याय मिळणार का, हा आमचा पहिला प्रश्न आहे. सत्तारुढ पक्ष आहे, शिवसेनेचे मंत्री आहेत म्हणून ते राज्यात काहीही करू शकतात, अशा प्रकारची भूमिका सत्तारुढ पक्षाची आहे का? त्यामुळ प्रतीक काळे याला न्याय द्याचया असेल, तर शंकरराव गडाख यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. तसेच ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी सरकारने त्यांना बाजूला केले पाहिजे. ते मंत्रिपदावर असताना पोलीस कारवाई करायला धजत नाहीत, असे चित्र आहे, असे ते म्हणाले. तसेच जर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यास टाळाटाळ केली तर भाजपा या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करेल, असेही उपाध्ये यांनी सांगितले.
Read Also :
- हॉटेल ‘The Lalit’ मध्ये काय गुपित दडलंय? नवाब मलिक रविवारी करणार मोठा गोप्यस्फोट
- 100 कोटी वसुली गुन्ह्यातील कमाईचे मुख्य लाभार्थी अनिल देशमुखचं; ईडीचा कोर्टात दावा
- सरकार अस्थिर करण्यासाठीच चौकशा लावल्या जाताय आहेत – धनंजय मुंडे
- भाजपच्या जनआक्रोश मोर्चात नियमांची ऐशीतैशी; गिरीष महाजन, रक्षा खडसेंसह आमदार-खासदारांवर गुन्हा दाखल
- भाऊबीजेची ओवाळणी म्हणून अजित दादांकडे गॅस सिलेंडरच मागणार – सुप्रिया सुळे