जळगाव : शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी मंत्री भाजप आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्यासह दहा जणांविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोणताही शत्रू शुद्र नसतो, भाजप कार्यकर्त्यांच्या धमन्यात संस्कार – पंकजा मुंडे
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपतर्फे सोमवारी दुपारी शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात आमदार गिरीश महाजन, भाजप महानगराध्यक्ष जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपचे सर्व आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हाभरातील विविध ठिकाणांहून शेतकरी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते ५-६ हजार लोकांचा जमाव जमला होता. जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेश लागू असतांना, तो, झुगारून मोर्चाचे आयेाजन करण्यात आले होते.
दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय; कलाबेन डेलकरांचा भगवा फडकला!
याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक राकेश दुसाने यांच्या फिर्यादीवरून भाजप आमदार गिरीश महाजन, महानगराध्यक्ष दीपक प्रभाकर सूर्यवंशी , खासदार उन्मेष पाटील ,खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदुलाल पटेल, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील या दहा जणांविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदीलकर करत आहेत.
Read Also :
- भाऊबीजेची ओवाळणी म्हणून अजित दादांकडे गॅस सिलेंडरच मागणार – सुप्रिया सुळे
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही
- भाजपचा उमेदवार कोसळला; देगलूरमध्ये काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा दणदणीत विजय
- आमदार महेशदादा लांडगेचं फेसबुक प्रोफाइल आता झालं अधिकृत, ब्लू-टिक असलेले शहरातील प्रथम आमदार
- मोठा धक्का: अखेर अजित पवारांची १ हजार कोटींची मालमत्ता आयकर विभागाने केली जप्त