मुंबई : दिवाळीपूर्वीच पेट्रोल दरवाढीचा भडका झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनंतर आता एलपीजी गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. एलपीजी गॅस सिलेंडर तब्बल 266 रुपयांनी महागला आहे. वाढत्या इंधन दरवाढीवरुन विरोधी पक्षांच्या नेत्यांना मोदी सरकारवर टीका केली आहे. यंदाच्या भाऊबीजेला भावाकडून सिलेंडरची टाकीच भेट मागणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
फटाके जरूर फोडा पण, धूर काढू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला
दिवाळी आणि दसऱ्यामध्ये जेवढा सिलेंडर आपल्याला लागतो तेवढा कधी लागत नाही. त्यातच, ‘सिलेंडरचा भाव वाढला आहे, मी अजित पवारांना या दिवाळीत सांगणार आहे. आम्ही आठ बहिणींनी ठरवले आहे की, आमच्या सहा भावांनी पुढच्या सहा महिन्यांसाठी आम्हाला प्रत्येकाने फक्त एक एक सिलेंडर द्यायचा, भाऊबीज म्हणून सिलेंडरच पाहिजे,’ असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. दिवाळीच्या काळातच पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव वाढला आहे. आर्यनला खानला आत ठेवून सरकारला आणखी भाववाढ करायची होती काय असे मला वाटत आहे. महागाईमुळे सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे, गॅसचे दर कमी करावेत यासंदर्भात मी संसदेत मागणी करणार असल्याचेही सुप्रिया सुळेंनी सांगितले.
कोणताही शत्रू शुद्र नसतो, भाजप कार्यकर्त्यांच्या धमन्यात संस्कार – पंकजा मुंडे
दरम्यान, मोदींनी दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅसच्या दरात 266 रुपयांनी वाढ केली. त्याबद्दल मी त्यांना सॅल्यूट करतो. मोदी हे हिंदू-मुस्लीम यांच्यात भेदभाव करत नाहीत, याचा हाच पुराव आहे, अशी खोचक टीका केआरकेनं केली आहे. तर, दिग्दर्शक अविनाश दास यांनी लिहिलं आहे की, ही तर शुभ दिवाळं निघालंय, असे ट्विट केलंय.
Read Also :
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही
- भाजपचा उमेदवार कोसळला; देगलूरमध्ये काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा दणदणीत विजय
- आमदार महेशदादा लांडगेचं फेसबुक प्रोफाइल आता झालं अधिकृत, ब्लू-टिक असलेले शहरातील प्रथम आमदार
- मोठा धक्का: अखेर अजित पवारांची १ हजार कोटींची मालमत्ता आयकर विभागाने केली जप्त
- दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय; कलाबेन डेलकरांचा भगवा फडकला!