बारामती : दिवाळी सुरू झाली आहे. काही लोक म्हणतात फटाके फुटणार. फटाके जरूर फोडा. पण धूर काढू नका, अशी जोरदार टोलेबाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामतीतील अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
दुहेरी दणका: अनिल देशमुखांना अटक, अजित पवारांची १०० कोटीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश
ते म्हणाले, मला यायला अडचण होती. पण ती अडचणही सांगून टाकतो. दोन चार दिवसांपासून माझे पाय धरले. कोणी पाय धरावे एवढा मोठा मी झालो नाही. आपले आपलेच धरले. त्यामुळे चालायला आणि उभं राहायला त्रास झाला. पण मी कधीच डगमगत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच हशा पिकला. राजकारणात टीकाकार असतात असलेच पाहिजे. आम्हीही इतके दिवस तुमचे टीकाकार आहोत. शिवसेना प्रमुख म्हणायचे, अरे शरदबाबू बारामतीत काय करतात ते जरा बघितलं पाहिजे. हे असे संबंध होते. राजकारणात पटत नाही म्हणून एखाद्याच्या कामात विघ्न आणणं योग्य नाही. पाठिंबा देता येत नाही तर किमान विघ्न आणू नये. पण काय करावं आपल्याकडे अनेक विघ्नसंतोषी लोकं आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.
अनिल देशमुखांनंतर पुढचा नंतर शिवसेना नेत्याचा; ‘त्या’ ट्विटमुळे उडाली खळबळ
शरद पवारांसारखा तरणाबांड नेता आपल्यासोबत आहे. सुप्रिया तू खरं सांगितलं की खोटं… सहस्त्रचंद्रदर्शन… ज्याने विकासाचा सूर्य दाखवला… अजूनही थांबत नाही. पवारसाहेब नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्राचं आणि या संस्थांचं. सर्व कुटुंबच तळमळीने काम करत आहे. कुटुंब रंगलं काव्यात तसं पवार कुटुंब एका ध्यासात रमलं आहे, अशी स्तुतीही त्यांनी केली.
Read Also :
- दादर-हवेलीमध्ये शिवसेनेची ऐतिहासिक विजयाकडे कूच; देगलूरमध्ये जितेश अंतापूरकर आघाडीवर
- देवेंद्र फडणवीसजी, आता माफी मागा; ‘त्या’ विषयावरून नवाब मलिक कडाडले
- आम्ही बॉम्ब फोडले तर भाजपाचे लोक बाथरुममध्ये तोंड लपवतील – संजय राऊतांचा इशारा
- तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस
- मुळा एज्युकेशन संस्थेतील कर्मचाऱ्याच्या सुसाइड नोटमध्ये शिवसेना मंत्र्याचं नाव?; भाजपची चौकशीची मागणी