मुंबई : अनेक महिन्यांनंतर ईडीसमोर हजर झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. अनिल देशमुख सोमवारी चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले होते. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुखांना अटक होताच किरीट सोमय्यांनी आता सेनेच्या नेत्याचा नंबर असल्याचं सांगत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
दुहेरी दणका: अनिल देशमुखांना अटक, अजित पवारांची १०० कोटीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश
100 कोटी वसुलीचा आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सोमवारी समोर आले. देशमुख यांनी भूमिका मांडत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजेरी लावली. 12 तास चौकशी केल्यानंतर ईडीकडून अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. देशमुख यांना अटक करण्यात आल्याचं वृत्त समोर आल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला.
काय म्हणाले सोमय्या?
अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर सोमय्यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ‘अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. 100 कोटींहून अधिक मनी लाँड्रिंग घोटाळा. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढणार. महिन्याला जी 100 कोटींची वसुली येत होती, त्यातील शरद पवारांकडे किती जात होती आणि उद्धव ठाकरेंकडे किती? अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर आहे’, असं सोमय्यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे.
At last Home Minister #AnilDeshmukh is arrested by ED. More than ₹100 Crores Non Transparent Transactions. Cash Trail
Next will be #AnilParab
अखेर ठाकरे सरकारचे गृहमंत्री #अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. ₹100 कोटींहून अधिक गैर-पारदर्शक व्यवहार.
अनिल देशमुख नंतर अनिल परब pic.twitter.com/SN2Tek9Q7n
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 1, 2021
अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणानंतर एनआयएने मुंबई पोलीस दलातील सचिन वाझेला अटक केली होती. या प्रकरणानंतर मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. बदलीनंतर परमबीर सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून खळबळजनक आरोप केला होता. सचिन वाझेनेही एनआयएला लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी शंभर कोटी वसुलीचं टार्गेट दिलं होतं. याच प्रकरणात वाझेने परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केलेले आहेत. याप्रकरणात ईडीकडून अनिल परब यांची एकदा चौकशीही झालेली आहे. त्यानंतर आता देशमुखांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.
Anil deshmukh.. Happy Diwali!
Anil Parab..Merry Christmas??
Special thanks to nawab malik n Sanjay raut 😅
— nitesh rane (@NiteshNRane) November 1, 2021
Read Also :
- दुहेरी दणका: अनिल देशमुखांना अटक, अजित पवारांची १०० कोटीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश
- देवेंद्र फडणवीसांवरील आरोपानंतर नितेश राणेंचा राष्ट्रवादीला इशारा, म्हणाले…
- राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या मंत्र्यांना पैसे खाण्याचे प्रशिक्षण देतो – गोपीचंद पडळकर
- शरद पवारांवरील चिखलफेक महाराष्ट्र सहन करणार नाही – संजय राऊत
- नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालायं, त्यांचा राजीनामा घ्या – प्रविण दरेकर