मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आज भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. एनसीबीने अटक केलेल्या एका ड्रग्ज तस्कराचा फडणवीस यांच्यासोबत संबंध असल्याचा दावा मलिक यांनी केला आणि या प्रकरणाच्या चौकशीचीही मागणी केली. नवाब मलिक यांच्या या आरोपांना देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही या वादात उडी घेतली आहे.
“नवाब मलिक यांनी हिट विकेट घालवली आहे. आता देवेंद्र फडणवीस हे ‘मौके पे चौका’ मारणार,” असं ट्वीट करत नितेश राणे यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाल्यानंतर नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे मैदानात उतरत असल्याचं याआधीही पाहायला मिळालं आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरून आगामी काळातही राणेंकडून मलिक यांच्यावर निशाणा साधला जाण्याची शक्यता आहे.
नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; पंकजा मुंडेची पहिली प्रतिक्रीया… म्हणाल्या…
नवाब मलिक यांनी आज एक फोटो ट्वीट करत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले. मलिक यांनी ट्विटरवरुन अमृता फडणवीसांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्ती ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा केला जात आहे.
Read Also :
- राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या मंत्र्यांना पैसे खाण्याचे प्रशिक्षण देतो – गोपीचंद पडळकर
- शरद पवारांवरील चिखलफेक महाराष्ट्र सहन करणार नाही – संजय राऊत
- नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालायं, त्यांचा राजीनामा घ्या – प्रविण दरेकर
- आदित्यजी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडा; भाजप नेत्या चित्रा वाघ यांच खरमरीत पत्र
- फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण…; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला