मुंबई : मलिकांनी वानखेडे प्रकरणी आता देवेंद्र फडणवीस आणि भाजप पक्षापर्यंत नेलं आहे. ड्रग्ज माफिया फडणवीसांच्या इशाऱ्यावर चालतात, असा आरोप केल्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी आता आपलं मत व्यक्त केलंय. त्यांनी म्हटंलय की, भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना ओढण्याचा प्रयत्न मालिकांना परिणाम भोगावे लागतील कारण नवाब मलिक यांचे आरोप बेछूट आहेत. पुरावे नसताना मलिक यांच्याकडून आरोप सुरु आहेत. त्यापेक्षा २९ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यावर बोला, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे तुम्ही जाण ठेवा : माजी उपसंरपंच अमोल शिवले
पुढे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की, मूळ मुद्दे भरकवटण्यासाठी मालिकांचे आरोप सुरु आहेत. समीर वानखेडे यांच्यासोबत अख्खा समाज उभा आहे. सत्ता असताना देखील तुम्हाला बेछूट आरोप का करावे लागत आहेत? सरकार तुमचंच आहे तर मग चौकशी करा, असंही त्यांनी म्हटलंय. तुम्हाला या प्रकरणाची CBI चौकशी करायची असेल तर खुशाल करावी, १९ महिन्यात आमचं काही वाकडे करु शकले नाहीत. उलट तुमच्याच मंत्र्यांवर आरोप झाले आहेत. आम्ही कोणाच्या नेत्याच्याही पत्नीवर बोललो नाही. पण अमृता वहिणींवर सातत्याने टीका केली जाते. देवेंद्रजींनी अजून किती संयम ठेवायचा? असा देखील त्यांनी सवाल केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग माफियांशी संबंध असून ते त्यांना संरक्षण देतात, हा सगळा खेळ त्यांच्या इशाऱ्यावर चालतो असा आरोप नवाब मलिकांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी आता पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. तसेच नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डसोबत संबध असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. याबाबतचा खुलासा मी दिवाळीनंतर करेन आणि बॉम्ब फोडेन, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मलिकांनी साधा लवंगी फटका फोडून मोठा आवाज केल्याचा आव आणत आहेत. मात्र दिवाळीनंतर फटाका मी फोडेन, असं त्यांनी म्हटलंय.
Read Also :
- अखेर ‘नॉट रिचेबल’ अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल; कसून चौकशी होणार?
- नवाब मालिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, दिवाळीनंतर बाँम्ब फोडणार; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
- ड्रग्स पेडलर आणि भाजपाचं नातं काय? अमृता फडणवीसांचा ‘तो’ फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा निशाणा
- मलिकसाहेब, तुम्हाला हे सगळं झेपेल का? चंद्रकांत पाटलांचा सवाल
- देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु; नवाब मालिकांचा खळबळजनक आरोप