मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आता पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. जो फोटो नवाब मलिक यांनी ट्विट केला आहे. तो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो. मी त्यांना मदत करत होतो. गाण्याच्या शूटिंगच्या वेळी तो फोटो काढण्यात आला होता. नवाब मलिक यांनी जाणीवपूर्वक एकच फोटो ट्विट केला याने यामागची मानसिकता दिसत आहे, असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केले आहे.
समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत – रामदास आठवले
रिव्हर मार्चने स्पष्ट केले आहे की तो भाड्यानं आणलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. नवाब मलिक ज्या प्रकारे म्हणाले भाजपचा ड्रग्स कनेक्शन तर नवाब मलिक यांचे जावंईच ड्रग्स सोबत सापडले आहे. दिवाळी नंतर मी बॉम्ब फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही.ज्याचे समंध अंडरवर्ल्ड सोबत आहेत, त्यांनी माझ्याशी बोलू नये. दिवाळी नंतर मी सगळं बाहेर काढणार आहे.Ncb च्या अधिकाऱ्यांनी दबावाखाली येऊन जावयाला सोडावे म्हणून हे सगळं चाललं आहे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे.
दिवाळीनंतर फटाके फोडणार, मंत्री आणि जावयांचे घोटाळे बाहेर आणणार – किरीट सोमय्या
पुढे ते म्हणले की, नीरज गुंडे यासंदर्भात स्वतः नवाब मलिक उत्तर देतील. पण नवाब मलिकांनी एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलायला हवं. नीरज गुंडे आणि आमचे चांगले संबंध आहेतच पण त्याहून अधिक उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आहेत.उद्धव ठाकरे यांच्या कडे नीरज गुंडे माझ्या पेक्षा जास्त वेळा गेले आहेत. माझ्या आधीपेक्षा त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी अधिक संबंध आहेत. पण मलिकांजवळ पुरावा असेल तर त्यांनी द्यावा. वाझे पाळायची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाही,” असे देखील देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणले आहेत.
Read Also :
- ड्रग्स पेडलर आणि भाजपाचं नातं काय? अमृता फडणवीसांचा ‘तो’ फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा निशाणा
- मलिकसाहेब, तुम्हाला हे सगळं झेपेल का? चंद्रकांत पाटलांचा सवाल
- देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु; नवाब मालिकांचा खळबळजनक आरोप
- संकटातग्रस्त शेतकऱ्यांची ठाकरे सरकार पोपटपंची करतयं, १ नोव्हेंबरला काळी फीत लावून आंदोलन – चंद्रकांत पाटील
- राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे तुम्ही जाण ठेवा : माजी उपसंरपंच अमोल शिवले