मुंबई : १०० कोटी वसुलीप्रकरणी आऱोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. कालच सीबीआयकडून पहिली अटक करण्यात आली होती. आज अनेक दिवसांनंतर अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. आज त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप असून आज त्यांना ईडी अटक करणार का? असाही प्रश्न आहे.
दिवाळीनंतर फटाके फोडणार, मंत्री आणि जावयांचे घोटाळे बाहेर आणणार – किरीट सोमय्या
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांचे टार्गेट दिले होते असा आरोप होता. त्यानंतर अनिल देशमुखांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, अनिल देशमुख हे चौकशीसाठी दाखल झाले नव्हते. त्यांना आतापर्यंत पाच समन्स पाठविले होते. मात्र, अनिल देशमुखांनी ईडीची कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतले होते. न्यायालयाने देखील त्यांना दिलासा दिला नाही. त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी झाली होती. आता अखेर नॉट रिचेबल अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे तुम्ही जाण ठेवा : माजी उपसंरपंच अमोल शिवले
दरम्यान, अनिल देशमुखांच्या घरावर ईडीसह सीबीआय आणि आयकर विभागाने देखील छापेमारी केली होती. त्यांच्या साई शिक्षण संस्थेमधून त्यांना काही पुरावे देखील मिळाले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा आणि सून यांना अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. मात्र, संपूर्ण कुटूंब हे अज्ञातवासात होतं.
Read Also :
- नवाब मालिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, दिवाळीनंतर बाँम्ब फोडणार; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
- ड्रग्स पेडलर आणि भाजपाचं नातं काय? अमृता फडणवीसांचा ‘तो’ फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा निशाणा
- मलिकसाहेब, तुम्हाला हे सगळं झेपेल का? चंद्रकांत पाटलांचा सवाल
- देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु; नवाब मालिकांचा खळबळजनक आरोप
- संकटातग्रस्त शेतकऱ्यांची ठाकरे सरकार पोपटपंची करतयं, १ नोव्हेंबरला काळी फीत लावून आंदोलन – चंद्रकांत पाटील