मुंबई : देगलूर बिलोली विधानसभा तसेच दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असून, सुरुवातीच्या काही फेऱ्यांचे कल हाती आले आहेत. दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. तर देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर आघाडीवर आहेत.
देवेंद्र फडणवीसांवरील आरोपानंतर नितेश राणेंचा राष्ट्रवादीला इशारा, म्हणाले…
लोकसभेसह विविध राज्यातील विधानसभेच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक झाली असून, आज निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभेची निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, महाविकास आघाडीचे उमदेवार जितेश अंतापूरकर यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली आहे. खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे केंद्र शासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिलेली असून, कलाबेन डेलकर यांनी जोरदार मुसंडी मारली आहे.
दुहेरी दणका: अनिल देशमुखांना अटक, अजित पवारांची १०० कोटीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश
कलाबेन डेलकर यांनी सातव्या फेरीअखेर 26,076 मतं मिळवत 6 हजार मतांची आघाडी घेतली होती. अकराव्या फेरीअखेर कलाबेन डेलकर यांना 44,723 मतं मिळाली असून, 15335 मतांनी पुढे आहेत. देगलूर बिलोली विधासभा पोटनिवडणुकीची मतमोजणीही सुरू असून, नवव्या फेरीअखेर जितेश अंतापूरकर यांनी 10583 मतांनी आघाडीवर आहेत. अंतापूरकर यांच्यासह भाजपकडून सुभाष साबने, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले अशी तिहेरी लढत इथे होत आहे.
दादर नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक- दहावी फेरीअखेर
कलाबेन डेलकर (शिवसेना)- 37724
महेश गावित (भाजप)- 27903
कलाबेन डेलकर 9821 मतांनी आघाडीवर
देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक निकाल
जितेश अंतापूरकर– पहिली फेरी (4216), दुसरी फेरी (3078), तिसरी फेरी (3418), चौथी फेरी (3788), पाचवी फेरी (3747), सहावी फेरी (4085), सातवी फेरी (3044), आठवी फेरी (3999), नववी फेरी (3693).
सुभाष साबणे– पहिली फेरी (2592), दुसरी फेरी (2409), तिसरी फेरी (2447), चौथी फेरी (2495), पाचवी फेरी (2134) सहावी फेरी (2487), सातवी फेरी (2600) आठवी फेरी (2709) नववी फेरी (2612).
डॉ. उत्तम इंगोले– पहिली फेरी (320), दुसरी फेरी (449), तिसरी फेरी (104) चौथी फेरी (352), पाचवी फेरी (280), सहावी फेरी (335), सातवी फेरी (449), आठवी फेरी (381), नववी फेरी (354).
Read Also :
- देवेंद्र फडणवीसजी, आता माफी मागा; ‘त्या’ विषयावरून नवाब मलिक कडाडले
- आम्ही बॉम्ब फोडले तर भाजपाचे लोक बाथरुममध्ये तोंड लपवतील – संजय राऊतांचा इशारा
- तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस
- मुळा एज्युकेशन संस्थेतील कर्मचाऱ्याच्या सुसाइड नोटमध्ये शिवसेना मंत्र्याचं नाव?; भाजपची चौकशीची मागणी
- अनिल देशमुखांनंतर पुढचा नंतर शिवसेना नेत्याचा; ‘त्या’ ट्विटमुळे उडाली खळबळ