नांदेड : काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना 1,08,840 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 872 मते मिळाली. अंतापूरकर यांनी 41 हजार 933 एवढ्या मताने विजय मिळविला आहे. देगलूर-बिलोली विधानसभेचे (Deglur Biloli Assembly Byelection Result 2021) आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाले होते. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. यासाठी ३० ऑक्टोबरला मतदान पार पडले. आज मंगळवारी मतमोजणी झाली पार पडली. मतदारांनी आज कौल महाविकास आघाडीला दिला आहे. पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसने भाजपला धोबीपछाड करून सोडले.
दादर-हवेलीमध्ये शिवसेनेची ऐतिहासिक विजयाकडे कूच; देगलूरमध्ये जितेश अंतापूरकर आघाडीवर
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांना 1 लाखापेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. तर सुभाष साबणे यांचा 41 हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसनं ही पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात लढवली. त्यामुळे चव्हाण यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरली होती. तर भाजपकडूनही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. मात्र, मतदारांवर त्याचा परिणाम दिसून आला नाही.
उमेदवार निहाय मिळालेली मतं
जितेश अंतापूरकर – 1 लाख 8 हजार 789
सुभाष साबणे – 66 हजार 872
उत्तम इंगोले – 11 हजार 347
विवेक सोनकांबळे – 465
Read Also :
- आमदार महेशदादा लांडगेचं फेसबुक प्रोफाइल आता झालं अधिकृत, ब्लू-टिक असलेले शहरातील प्रथम आमदार
- मोठा धक्का: अखेर अजित पवारांची १ हजार कोटींची मालमत्ता आयकर विभागाने केली जप्त
- दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय; कलाबेन डेलकरांचा भगवा फडकला!
- कोणताही शत्रू शुद्र नसतो, भाजप कार्यकर्त्यांच्या धमन्यात संस्कार – पंकजा मुंडे
- फटाके जरूर फोडा पण, धूर काढू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला