मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रात्री ईडीनं अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांना ६ नोव्हेंबर पर्यंत ED कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी ईडीने न्यायालयाला सांगितलं की, अनिल देशमुख हे 100 कोटी वसुली गुन्ह्यातील कमाईचे “मुख्य लाभार्थी” होते. तसंच अनिल देशमुख मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात थेट सहभागी होते. त्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे.
मोठा धक्का: अखेर अजित पवारांची १ हजार कोटींची मालमत्ता आयकर विभागाने केली जप्त
6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला आहे. 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणात अनिल देशमुख हे महत्त्वाचा दुवा म्हणून पुढे आले असे ED ने आपल्या रिमांड नोटमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणात परकीय षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे ईडीने म्हटलं आहे.
आमदार महेशदादा लांडगेचं फेसबुक प्रोफाइल आता झालं अधिकृत, ब्लू-टिक असलेले शहरातील प्रथम आमदार
ईडीने राज्याचे गृहमंत्री असताना देशमुख यांनी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांच्या तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं सोमवारी रात्री उशिरा त्यांना अटक केली. तर त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.
Read Also :
- सरकार अस्थिर करण्यासाठीच चौकशा लावल्या जाताय आहेत – धनंजय मुंडे
- भाजपच्या जनआक्रोश मोर्चात नियमांची ऐशीतैशी; गिरीष महाजन, रक्षा खडसेंसह आमदार-खासदारांवर गुन्हा दाखल
- भाऊबीजेची ओवाळणी म्हणून अजित दादांकडे गॅस सिलेंडरच मागणार – सुप्रिया सुळे
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही
- भाजपचा उमेदवार कोसळला; देगलूरमध्ये काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा दणदणीत विजय