बीड : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर भाजपकडून चिखलफेक करण्यात येत आहे. भाजपकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य केलं जातंय. आता माजी गृहमंत्री अनिल परब यांच्या अटकेवरून पुन्हा एकदा राजकारण तापलं असून, आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी पलटवार केला आहे. परळीमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. ते पत्रकारांशी बोलत होते.
दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय; कलाबेन डेलकरांचा भगवा फडकला!
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेले आरोप खोटे असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय. सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जात आहेत. आणि चौकशीला सामोरं गेलं नाही तर मात्र अटक करायचं, भाजपकडून राजकारण करण्यात येत असल्याच धनंजय मुंडे यांनी सांगितलंय. भाजपने कितीही प्रयत्न केला तरी महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. तर कोणत्याही चौकशीला अजितदादा सामोरे जाणार असल्याचे देखील धनंजय मुंडे यावेळी म्हणालेत.
मोठा धक्का: अखेर अजित पवारांची १ हजार कोटींची मालमत्ता आयकर विभागाने केली जप्त
अनिल देशमुख चौकशी यंत्रणेला सहकार्य करत असताना त्यांना अटक होणं हेच मुळात दुर्दैवी आहे, अशी भावना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलीय. आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घ्यावा. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग बेपत्ता आहेत, ते जर परदेशात गेले असतील तर त्यांना कुणाची साथ आहे? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय.
Read Also :
- भाजपच्या जनआक्रोश मोर्चात नियमांची ऐशीतैशी; गिरीष महाजन, रक्षा खडसेंसह आमदार-खासदारांवर गुन्हा दाखल
- भाऊबीजेची ओवाळणी म्हणून अजित दादांकडे गॅस सिलेंडरच मागणार – सुप्रिया सुळे
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही
- भाजपचा उमेदवार कोसळला; देगलूरमध्ये काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा दणदणीत विजय
- आमदार महेशदादा लांडगेचं फेसबुक प्रोफाइल आता झालं अधिकृत, ब्लू-टिक असलेले शहरातील प्रथम आमदार