नागपूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एका राष्ट्रीय चॅनलवर काल डिबेटमध्ये राज्य सरकारवर आरोप केले होते. परंतू, किरीट सोमय्या हे नेहमीच खोटं बोलतात. केलेल्या आरोपाचे किरीट सोमय्या यांनी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. नागपुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही
राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेची टक्केवारी सोमय्या यांनी डिबेटमध्ये जाहीर केली. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेपैकी 40 टक्के रक्कम शिवसेनेला मिळते. 40 टक्के रक्कम राष्ट्रवादीला मिळते, तर 20 टक्के रक्कम काँग्रेसला मिळते, असा आरोप सोमय्या यांनी डिबेटमध्ये केल्याचं लोंढे यांनी सांगितलं. सदर आरोप करत असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नव्हते. सार्वजनिकरित्या असे खोटे आरोप करणं काँग्रेस खपवून घेणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली. सोमय्या नेहमीच खोटे आरोप करत असतात. त्यांनी केलेले खोटे आरोप रेक्रार्ड केले असून, याची तक्रार नागपूर पोलीस आयुक्तांकडे केली असल्याचं अतुल लोंढे म्हणाले.
भाऊबीजेची ओवाळणी म्हणून अजित दादांकडे गॅस सिलेंडरच मागणार – सुप्रिया सुळे
किरीट सोमय्या यांच्याविरोधात फौजदारी आणि दिवाणी बदनामे करणारे गुन्हे दाखल करण्याची मागणी लोंढे हे न्यायालयात करणार आहेत. काल टीव्ही डिबेटमध्ये किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर सुलीचा आरोप केला होता. केलेल्या आरोपाचे किरीट सोमय्या यांनी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी असेही लोंढे म्हणाले. या संदर्भातील पुरावा व्हीडिओ पुरावा पोलीस आयुक्तांना दिल्याचं त्यांनी सांगितले. काँग्नेसनं ॲड. सतीश उके यांची वकील म्हणून नेमणूक केली आहे. सोमय्यांविरोधात न्यायालयात जाणार असून मानहानीचा दावा करणार करणार असल्याचं ते म्हणाले.
Read Also :
- प्रतिक काळेच्या आत्महत्येला मंत्री गडाख जबाबदार, पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न – केशव उपाध्येय
- हॉटेल ‘The Lalit’ मध्ये काय गुपित दडलंय? नवाब मलिक रविवारी करणार मोठा गोप्यस्फोट
- 100 कोटी वसुली गुन्ह्यातील कमाईचे मुख्य लाभार्थी अनिल देशमुखचं; ईडीचा कोर्टात दावा
- सरकार अस्थिर करण्यासाठीच चौकशा लावल्या जाताय आहेत – धनंजय मुंडे
- भाजपच्या जनआक्रोश मोर्चात नियमांची ऐशीतैशी; गिरीष महाजन, रक्षा खडसेंसह आमदार-खासदारांवर गुन्हा दाखल