मुंबई : देवेंद्र फडणवीस तुम्ही 1999 ला या शहरात आलात. यापूर्वी गोपीनाथ मुंडे नेते होते. त्यांनी देखील अशाचं प्रकारचे अनेक आरोप केले होते. गेल्या 62 वर्षांच्या जीवनात किंवा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर 26 वर्षांच्या काळात कोणी आरोप करु शकलं नाही. मात्र, तुम्ही माझ्यावर कवडीमोल दरानं जागा खरेदी केल्याचा आरोप केला. तुम्हाला माहिती देणारे व्यक्ती कच्चे खेळाडू असल्याचा पलटवार नवाब मलिक यांनी केला. मीच तुम्हाला कागदपत्रं दिली असती, असं मंत्री नवाब मलिक म्हणाले.
वानखेडेंच्या मेव्हणी देखील ड्रग्झचा व्यवसाय करतात का? नवाब मालिकांचे खळबळजनक ट्विट
तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केला आहे. मी आज बोलणार नाही. उद्या देवेंद्र फडणवीस यांचा अंडरवर्ल्डचा काय खेळ महाराष्ट्रात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना शहरात होस्टेज बनवलं होतं याचा उद्या 10 वाजता भांडाफोड करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टी वाढवून सांगण्याचा प्रयत्न केला. 62 वर्षात कोणीही आरोप करु शकलं नाही. कोणत्याही यंत्रणेसमोर जायचंय ते जावा. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी जे करायचंय ते करा. सरकारी दप्तरात त्याची नोंद आहे. झुठ बोलो जरा ढंग से बोलो, असा टोला नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. देवेंद्र फडणवीस तुम्ही अंडरवर्ल्डचा मुद्दा पुढं आणलाय तर मी उद्या सकाळी अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
आम्ही दीड लाख फुट जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी आरोप केला. खोटे भाडेकरु ठेवल्याचा आरोप केला. त्या दीड लाख फुट जमिनीची पाहणी करा. त्या जागेवर शेख मदिनातुल्ल अमान हौसिंग सोसायटी आहे.1984 मध्ये तिथ इमारत बांधण्यात आली. ती मुनिरा पटेल यांनी रस्सीवाला यांना विकासाचे अधिकार देऊन 140 लोकांना घरं दिली. त्याच्या मागं जमीन आहे त्यावर झोपडी आहे. तिथं जमीन आहे तिथं सॉलिडस कंपनीकडं जमीन आहे. गेल्या 30 वर्षांपासून ती जमीन आमच्याकडे आहे. 1996 मध्ये भाजप आणि शिवसेना पार्टीची सत्ता होती. 9 नोव्हेंबरमध्ये नवाब मलिक यांनी शिवसेना भाजपकडून पोटनिवडणूक विजयी झाले होते. त्याच गोवावाली बील्डिंगच्या कार्यालयात जल्लोष करण्यात आला होता. आम्ही भाडेकरु होते. मुनिरा पटेल यांनी आमच्याशी संपर्क करुन आमच्याकडे असलेल्या जागेचा पूर्ण ताबा घ्या असं म्हटलं. आम्ही मालकिणीकडून जमीन घेतली. सलीम पटेल याला मुनिरा पटेल यांनी पॉवर ऑफ अॅटर्नी केल होतं. सरकारी दरानुसार आम्ही स्टॅम्प ड्युटी भरली होती. सरकारी कागदपत्रात त्याचा उल्लेख आहे.
संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर; भेटीच नेमकं कारण काय?
देवेंद्र फडणवीस यांनी वाढवून बॉम्ब स्फोटाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला. सरदार वली खानचा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीसांना माहिती देणाऱ्यांनी माहिती दिली नाही की सरदार वली खानचं घर आहे. सरदार वली खानचे वडील गोवावाला कम्पाऊंडमध्ये वॉचमनचं काम करतात.ज्यावेळी मुनिरा पटेल यांच्याकडून जमीन घेतली तेव्हा सरदार वली खाननं 300 मीटरवर नाव चढवलं होतं. ते पैसे देऊन सरेंडर करण्याचं काम केलं. तिथं आमची दुकानं आहेत. गोवावाला बील्डिंगमधील संपत्ती त्यावेळी आमची होती. बिअर बार देखील तिथं होता, मुस्लीम समाजाच्या दबावामुळं आम्ही बिअर बार सरेडंर केला, असं नवाब मलिक म्हणाले. खान कुटुंब आणि पठाण कुंटुंबानं सातबाऱ्यावर नाव चढवलं होतं ते कमी कऱण्याचं काम केलं.
Read Also :
- एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन बेकायदेशीर, कर्मचाऱ्यांनी आर-पार’ची लढाई करू नये – अनिल परब
- उदय शेट्टी आणि मजनू मध्ये संजय राऊतांचा घुंगरू सेठ झालाय – चित्रा वाघ
- 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून नवाब मलिकांनी जमीन घेतली; देवेंद्र फडणवीसांनी बाँम्ब फोडला
- मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का? आर. आर. पाटील यांच्या लेकीची भावूक पोस्ट व्हायरल
- माझ्या एका खिशात ब्राह्मण अन् दुसऱ्या खिशात वाणी; भाजप नेत्याच वादग्रस्त वक्तव्य