नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सहा जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२२ रोजी विधानपरिषदेच्या आठ आमदारांचा कार्यकाळ संपत जरी असला, तरी सहा जागांसाठीच निवडणूक होत आहे.
माझ्या एका खिशात ब्राह्मण अन् दुसऱ्या खिशात वाणी; भाजप नेत्याच वादग्रस्त वक्तव्य
ज्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यामध्ये शिवसेनेची रामदास कदम यांची मुंबईतील जागा, काँग्रेसची भाई जगताप यांची मुंबईतील जागा आणि सतेज पाटील यांची कोल्हापूरमधील जागा. तसेच, भाजपाची धुळे-नंदुरबार येथील अमरीश पटेल यांची जागा व नागपूर मधील गिरीश व्यास यांची जागा याचबरोबर शिवसेनेची अकोला-बुढाणा-वाशीम येथील गोपीकिशन बाजोरिया यांच्या जागेचा समावेश आहे. तर, सोलापूर व अहमदनगर येथील जागेसाठी निवडणूक होणार नाही.
निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना जाहीर : 16 नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याचा दिनाक: 23 नोव्हेंबर
अर्जांची छाननी: 24 नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची मुदत: 26 नोव्हेंबर
मतदान : 10 डिसेंबर (सकाळी 8 ते 4)
मतमोजणी : 14 डिसेंबर
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक: 16 नोव्हेंबर
आगामी काळात होणा-या विधानपरिषेदच्या जागेसाठी शिवसेनेत अनेकांनी नंबर लावले आहेत. यात अनेक नेत्यांचे पुर्नवसन होणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर काही पराभूत झालेल्या उमेदवारांना संधी मिळणार का बाहेरून आलेल्या नेत्यांना प्राधान्य देणार अनेकांची नावं ही चर्चेत आहेत. माजी मंत्री व शिवसेना जेष्ठ नेते रामदास कदम हे सध्या विधान परिषदेत शिवसेनेचे सदस्य आहेत. त्यांची मुदत पुढील वर्षीच्या पहिल्याच महिन्यात संपणार आहे. मात्र, त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यांच्या ऐवजी नव्या चेहऱ्याला विधान परिषदेत आणलं जाणार आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्या उमेदवाराची निवड केली जाणार असल्याचं समजतं.
Read Also :
- देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी संबंध; उद्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडणार – नवाब मलिक
- एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन बेकायदेशीर, कर्मचाऱ्यांनी आर-पार’ची लढाई करू नये – अनिल परब
- उदय शेट्टी आणि मजनू मध्ये संजय राऊतांचा घुंगरू सेठ झालाय – चित्रा वाघ
- 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून नवाब मलिकांनी जमीन घेतली; देवेंद्र फडणवीसांनी बाँम्ब फोडला
- मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का? आर. आर. पाटील यांच्या लेकीची भावूक पोस्ट व्हायरल